Beauty : चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 10:10 AM
टोमॅटोच्या सेवनाने जे फायदे होतात ते फायदे इतर फळे आणि हिरवा भाजीपाला सेवन केल्यानेही होत नाहीत, जाणून घ्या टोमॅटोचे फायदे !
-रवींद्र मोरे जसजसे वय वाढते तसतसे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसायला लागतात. चेहरा निस्तेज होण्याबरोबरच चेहऱ्यावर सुरकुत्या जाणवू लागतात. सेलिब्रिटी मात्र वाढते वय लपविण्यासाठी डायट बरोबरच घरगुती उपायांना प्राधान्य देतात. त्यांच्या आहारात टोमॅटोचा आवर्जून वापर असतोच. कारण टोमॅटोतील उपयुक्त घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.जाणून घेऊया टोमॅटोचे फायदे टोमॅटोमध्ये विटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आहे, शिवाय यात कॅलरी कमी असतात. टोमॅटोच्या सेवनाने जे फायदे होतात ते फायदे इतर फळे आणि हिरवा भाजीपाला सेवन केल्यानेही होत नाहीत, असे चीन आणि जापानच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे. टोमॅटोमुळे आपली त्वचा चांगल्याप्रकारे ग्लो होण्यास मदत होते. अतिनिल किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान टोमॅटोच्या सेवनाने दूर होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. टोमॅटोमुळे प्रत्येक खाद्यपदार्थ स्वादिष्ट होतो. टोमॅटोच्या नियमित सेवनाने डिप्रेशनसारखी समस्याही दूर होते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टोमॅटोमध्ये नैसर्गिक विटॅमिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यात विशेषत: विटॅमिन ए, बी१, बी३, बी५, बी६, बी७ आणि विटॅमिन सी चा समावेश आहे. यासोबतच टोमॅटोमध्ये फोलेट, आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्रोनियम, कोलिन, जिंक आणि फॉस्फोरसदेखील असते. * टोमॅटोचे अन्य फायदे- त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - कॅन्सर सेल्सला वाढण्यापासून मज्जाव होतो - हाडांसाठी लाभदायक - टोमॅटो एक मोठा अॅन्टी-आॅक्सिडेंट आहे- टोमॅटो ह्रदयाचीही काळजी घेतो - ब्लड शुगर नियंत्रणात राहते - पचन शक्ती क्रियाशील होते - रोग प्रतिकारशक्ती सुदृढ राहते - चरबी कमी होण्यास मदत होते Also Read : BEAUTY TIPS : चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !