Beauty : फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 8:21 AM
सेलिब्रिटींमध्ये ही क्रेझ पाहून आपणासही बऱ्याचदा फुल दाढीचा मोह होतो. आज आम्ही आपणास फुल दाढीसाठी काय उपाय करावा यासाठी काही टिप्स देत आहोत.
फुल दाढी आणि फुल मिशी असलेल्या पुरुषाचे आकर्षण दुपटीने वाढते. सध्या फुल दाढीची स्टाइल सेलिब्रिटींमध्येही मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. त्यांच्यातील ही क्रेझ पाहून आपणासही बऱ्याचदा फुल दाढीचा मोह होतो. आज आम्ही आपणास फुल दाढीसाठी काय उपाय करावा यासाठी काही टिप्स देत आहोत.आपण लिंबूचा वापर आहारात मोठ्याप्रमाणात करतो, मात्र सौंदर्य खुलविण्यासाठीदेखील लिंबूचा वापर करू शकतो. शिवाय लिंबूचा साधा आणि सोपा उपाय केल्यास फुल दाढीची आपली हौसदेखील पुर्ण होऊ शकते. कसा वापर कराल?सर्वप्रथम दालचिनी पावडरमध्ये लिंबूचा रस एकत्र करुन पेस्ट तयार करा. या पेस्टला रोज ज्याठिकाणी दाढीला केस कमी येतात किंवा येतच नाही त्या जागेवर लावा. या पेस्टला कमीत कमी त्या जागेवर २० मिनिटापर्यंत लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. काही वेळानंतर नारळ तेलात थोडे पाणी एकत्र करुन त्या जागेवर चांगला मसाज करा. लिंबू आणि दालचिनीना हा उपाय दाढीच्या केसांची वाढ करतो. याने दाढी असलेल्या त्वचेवर मृत पेशी जीवंत होतात आणि चेहºयाच्या नसांमध्ये रक्तसंचारदेखील वाढतो. Also Read : YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !