लिपस्टिक ओठांचं सौंदर्य वाढवण्यासोबतच चेहरा आकर्षक करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेकदा एक्सपर्ट्स आपला चेहरा आणि त्वचा यांनुसारचं लिपस्टिकचा रंग निवडण्याचा सल्ला देतात. त्याचप्रमाणे ते लिपस्टिक तयार करताना समाविष्ट करण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत नीट वाचून घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे ओठांचे आरोग्य चांगले रहाते.
लिपस्टिक लावण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लिपस्टिकमुळे ओठांचा यूव्ही रेजपासून बचाव होत असून ते मुलायमही होतात.
लिपस्टिकमुळे तुमच्या सौंदर्यात आणखी बर पडते. योग्य रंग निवडल्यामुळे तुमचं हास्य आणखी खुलून दिसते. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, लिपस्टिक लावणाऱ्या महिला स्वतःला जास्त कॉन्फिडन्ट आणि पॉवरफुल समजतात. अशा महिलांना जास्त अट्रॅक्टिव्ह समजलं जातं.
लिपस्टिक लावण्याचा आपल्यावर मानसिक परिणामही होत असतो. लिपस्टिकला चांगलं मूड लिफ्टर मानलं जातं. तसंच लिपस्टिकमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
लिपस्टिकमध्ये अनेक प्रकार आढळून येतात. आपल्या लूकनुसार लिपस्टिक लावणं गरजेचं असतं. लिपस्टिक तुम्हाला सेक्सी आणि बोल्ड लूक देण्याचंही काम करते.