सध्या बाजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि विविध ब्रँड्सची सौंदर्यप्रसाधनं आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने क्रिम्स, फाउंडेशन, मॉयश्चरायझर्स, लिपस्टिक्स यांसारख्या इतरही अनेक प्रोडक्ट्सचा समावेश होतो. पण यातीलच एक क्रिम म्हणजे बीबी क्रिम (BB Cream). सध्या अनेक महिला आपल्या मेकअप रूटीनमध्ये अगदी सर्रास बीबी क्रिमचा वापर करताना दिसून येतात. बीबी क्रिमला ब्लीमिश बाम किंवा ब्यूटी बाम असंही म्हटलं जातं. ही क्रिम लावण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि एकच क्रिम पूर्ण चेहरा कवर करण्यासाठी मदत करते. जाणून घेऊयात बीबी क्रिमचे त्वचेसाठी होणारे फायदे...
सुरकुत्या कमी करण्यासाठी
बीबी क्रिम चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या क्रिमचा नियमित वापर केल्याने सुरकुत्या पडलेली स्किन टाइट होण्यास मदत होते. त्यामुळे बीबी क्रिम वयाची चाळीशी पार केलेल्या महिलांसाठी मदत करते.
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी
बाजारात उपलब्ध असणाऱ्या बीबी क्रिम्स त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी फार उपयोगी ठरतात. खरं तर तुमच्या चेहऱ्यासाठी कोणती क्रिम सुटेबल ठरेल हे तुमच्या कॉम्प्लेक्सनवर डिपेंड असतं. त्यामुळे कोणतीही क्रिम विकत घेण्याआधी कॉम्प्लेक्सनवर लक्ष देणं गरजेचं असतं.
उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी उपयोगी
बीबी क्रिम कामासाठी सतत घराबाहेर असणाऱ्या महिलांसाठी फार उपयुक्त ठरते. कारण सतत घराबाहेर असल्यामुळे उन्हामुळे स्किन टॅनिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्याचे काम बीबी क्रिम करते.
पिंपल्सपासून सुटका
बीबी क्रिमच्या रेग्युलर आणि योग्य वापरामुळे पिंपल्स दूर होण्यासोबतच पॅची स्किनपासूनही सुटका होते. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी, ई आणि ए चेहऱ्यावर अॅन्टी-एजिंग एलिमेंटप्रमाणे काम करते. तसेच पिंपल्समुळे होणारे अॅक्ने दूर करण्यासाठीही बीबी क्रिम उपयोगी ठरते.
पावसाळ्यात मिळतो परफेक्ट लूक
बीबी क्रिमचा वापर पावसाळ्यात करणं ठरतं फायदेशीर. पावसाळ्याच चेहऱ्याचा लूक व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते. तसेच मेकअपही टिकून राहण्यास मदत होते.