आपण जेव्हा आपण पार्लरमध्ये जातो त्यावेळी डार्क चॉकलेट या फ्लेवर्सची वेगवेगळी उत्पादनं पहायला मिळतात. वॅक्स असेल फेशियल क्रीम किंवा अन्य गोष्टींमध्ये डार्क चॉकलेट हा फ्लेवर वापरला जातो. डार्क चॉकलेटचे त्वचेच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. ज्याचा वापर आपण घरच्याघरी करून सुध्दा त्वचेचा रंग उजळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया डार्क चॉकलेटचा कसा कारायचा वापर.
डार्क चॉकलेटमध्ये साइकोऐक्टिव इंग्रीडिऐंट्स असतात. त्यामुळे हे हॅप्पी हार्मोन्सना रिलीज करतात. त्यामुळे चेहरा तजेलदार आणि चमकदार दिसतो. सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवत नाही.जर तुमच्या चेहऱ्यावर काळपटपण आला असेल तर डार्क चॉकलेटचा फेसपॅक खूप उपयोगी ठरतो. हा पॅक तयार करण्यासाठी तुम्ही २ चमचे डार्क चॉकलेट पावडरमध्ये एक चमचा मध आणि १ चमचा दूध मिसळून घ्या. आवश्यकेनुसार दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. त्यानंतर हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. हा प्रयोग केल्यास त्वचेत लगेच फरक जाणवेल.
डार्क चॉकलेट आणि मुलतानी माती एकत्र करा. त्यात गुलाबपाणी मिक्स करा. याची पेस्ट चेहरा स्वच्छ धुवून लावा. त्यानंतर हा पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. त्यानंतर त्वचेवर तुम्हाला सुट होत असेल ते मॉईश्चराईजर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे तुमची स्कीन ग्लोईंग आणि तजेलदार दिसेल. जर तुम्हाला तुमची स्कीन पिंपल्सपासून मुक्त ठेवायची असेल तर वर माहीती दिलेल्या पॅकपैकी कोणताही पॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.
याशिवाय त्वचेला सॉफ्ट आणि मुलायम बनवण्यासाठी तसंच त्वचेवरचे डाग काढण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेटचा वापर करू शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो. तसेच मूड चांगला होण्यास, स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढण्यास मदत होते . कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.