सध्या पाऊस पडत असला तरिही उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. अशा बदलणाऱ्या वातावरणामध्ये त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या ब्युटी किटमध्ये मिस्ट असणं आवश्यक आहे. मिस्ट तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं आणि त्वचेला कूलिंग इफेक्ट देतं. एवडचं नाही तर मिस्ट प्रदूषणामुळे त्वचेवर झालेले साइड इफेक्ट्स कमी करून मेकअपही रिसेटही करते. जर तुमची स्किन ड्राय असेलतर मिस्ट तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्ही स्किनसाठी नॅचरल गोष्टींनाच पसंती देत असाल आणि मिस्टवर जास्त पैसे खर्च करणं तुम्हाला मान्य नसेल तर घरीच मिस्ट तयार करू शकता.
रोजवॉटर मिस्ट
घरीच रोजवॉटर मिस्ट तयार करण्यासाठी एक कप गुलाबाच्या पाकळ्या, 2 कप पाणी आणि 5 ते 10 ड्रॉप जेरॅनियम इसेंशल ऑइलची गरज असते. सर्वात आदी गुलाबाच्या पाकळ्या पाण्यामध्ये उकळून घ्या. थंड झाल्यानंतर गाळून एका बॉटलमध्ये ठेवा. बॉटलमध्ये जेरॅनियम ऑइल व्यवस्थित एकत्र करून घ्या. तयार मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्या.
कुकंबर मिस्ट
एक कापलेली काकडी, अर्ध लिंबू, एक ऑर्गॅनिक मिंट टी बॅग आणि अर्धा कप डिस्टिल्ड वॉटर घ्या. सर्वात आधी काकडी मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा. टी बॅग काही वेळासाठी गरम पाण्यामध्ये एकत्र करा. जेव्हा थंड होईल त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.
ग्रीन टी मिस्ट
ग्रीन टी सर्वात उत्तम अॅन्टीऑक्सिडंट आहे आणि फेस मिस्टसाठी बेस्ट आहे. यासाठी तुम्हाला दोन कप पाणी उकळून घ्यावं लागेल, 2 ग्रीन टी बॅग्स आणि 2 ते 3 थेंब व्हिटॅमिन ई कॅप्सुलची गरज असेल. या टी बॅग्स उकळून पाण्यामध्ये ठेवा. पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर हे बाटलीमध्ये भरा आणि यामध्ये व्हिटॅमिन ई एकत्र करा. फ्रिजमध्ये थंड करून वापर करा.
एलोवेरा मिस्ट
एलोवेरा मिस्ट तयार करण्यासाठी 3 चमचे ऑर्गॅनिक एलोवेरा जेल घ्या. त्यामध्ये लिंबाचा ज्यूस आणि अर्धा कप डिस्टिल्ड वॉटर घ्या. हे सर्व पदार्थ एकत्र करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. आता बॉटल फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा आणि वापर करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.