Himalayan salt water : सैंधव मिठाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. उपवास किंवा उत्सवांदरम्यान या मिठाचा अधिक वापर केला जातो. कारण हे मीठ पांढऱ्या मिठाच्या तुलनेत अधिक पवित्र मानलं जातं. आजकाल सैंधव मीठ हे आपल्या गुणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. महत्वाची बाब म्हणजे अनेक गंभीर आजारांवर हे मीठ रामबाण उपाय ठरतं. सैंधव मिठाला हिमालयन सॉल्ट असंही म्हटलं जातं. हलक्या गुलाबी रंगाच्या या मिठामध्ये अनेक पौषक तत्व असतात. अशात या मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हिमालयन सॉल्ट कुठून येतं?
भारतात हिमालयन सॉल्ट सामान्यपणे पाकिस्तानातून येतं. भारतात फार पूर्वीपासून याचा वापर केला जातो. हे मीठ पाकिस्तानातील खेवडा नावाच्या खाणीतून येतं. यात पोटॅशिअम ते मॅग्नेशिअम अशा अनेक खनिजांचा भांडार असतो. याच कारणाने या मिठाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या मिठाच्या मदतीने अनेक गंभीर आजार, वेदना आणि तणाव दूर करण्यास मदत मिळते. जर तुम्हालाही या मिठापासून फायदा मिळवायचा असेल तर या मिठाच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवून बसा.
ब्लड प्रेशर होईल कंट्रोल
हिमालयन सॉल्टमधील मिनरल्स मांसपेशींमधील आखडलेपणा दूर करतात आणि ब्लड सर्कुलेशन योग्यपणे करतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. आहारात याचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होतं, ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.
तणाव दूर होतो
जर तुम्हाला तणावाची समस्या असेल आणि तो संतुलित ठेवायचा असेल तर सैंधव मिठाचं तुम्ही सेवन करू शकता. यात असलेल्या मेलाटोनिन आणि सेराटोनिनने हार्मोन्स कंट्रोल होतात. यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत मिळते.
त्वचा चांगली राहते
जर तुम्हाला त्वचेचं आरोग्य आणखी चांगलं ठेवायचं असेल तर या मिठाच्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवून बसा. यासाठी अर्धा बकेट पाणी आधी गरम करा आणि त्यात एक चमचा सैंधव मीठ टाका. यात पाय ठेवून बसा. याने पायांची डेड स्कीन आणि पायांच्या भेगा, ड्राय स्कीन दूर होईल. पाय मुलायम आणि चमकदार होतील.
वेदना होईल दूर
जर तुम्हाला पायांच्या जॉईंट्समध्ये वेदना होत असेल, गुडघे दुखत असतील तर सैंधव मिठाच्या पाण्यात पाय ठेवून काही वेळ बसा. याने तुम्हाला या समस्या दूर करण्यास मदत मिळेल.
हाडे होतील मजबूत
सैंधव मिठामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत मिळते. यात मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात. अशात या मिठाच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवून बसल्याने तुम्हाला हाडांचं दुखणं दूर करण्यास मदत मिळेल. तसेच पायांवरील सूजही कमी होईल.
झोप न येण्याची समस्या होईल दूर
आजकाल अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी झोप न येण्याची समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. या मिठाच्या पाण्यात अर्धा तास पाय ठेवून बसल्यावर तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होईल.