प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या त्वचेला उद्भवत असलेल्या समस्यांचे स्वरूप वेगळं असतं. त्यातल्या त्यात पिंपल्स आणि वय वाढीच्या समस्या सतत जाणवत असतात. ओली हळद ही त्वचेसाठी फायदेशीर असते. अनेकप्रकारे ओल्या हळदीचा वापर करून तुम्ही स्वतःच्या त्वचेचं सौंदर्य खूलवू शकता. हळदीचा वापर तुम्ही वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये केलेला असतो. हळदीचा पॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या आणि काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल. कारण हे घरगुती वापराचे पदार्थ असल्यामुळे केमिकल्स विरहीत असतात. म्हणून कोणत्याही प्रकारचं त्वचेचं नुकसान होण्याचा धोका नसतो.
कोरड्या त्वचेसाठी ओली हळद आणि दुधाची साय लाभदायक ठरतं असते. हिवाळ्यात त्वचेवर खुप कोरडेपणा आलेला असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या सुद्धा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओल्या हळदीला आणि दुधाच्या सायीला एकत्र करून परफेक्ट नरिशमेंट फेसपॅक तयार करा. ( हे पण वाचा-ना थ्रेडिंग ना रेजर, वॅक्सिंगचा हा उपाय सर्वात बेस्ट, जुने सगळे उपाय विसराल...)
त्यासाठी सगळ्यात आधी हळद स्वच्छ धूवून घ्या. मग किसून घ्या. दोन चमचे ओली हळद किसल्यानंतर त्यात दुधाची साय घाला. त्यानंतर या मिश्रणाला मिक्स करा. त्यानंतर चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावा. २० मिनिटांनंतर हे लावलेले मिश्रण कोमट पाण्याने धुवून टाका. त्यामुळे तुमची त्वचा मऊ मुलायम दिसेल. तसंच प्रदुषणामुळे चेहरा आणि मानेवर आलेले टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. त्वचेवरच्या मृतपेशी निघून जाण्यासाठी फायदेशीर ठरेल. ( हे पण वाचा-दररोज जिन्स घालत असाल तर करू नका 'या' चुका, परफेक्ट लूकसाठी खास टीप्स)
तेलकट त्वचेसाठी सुद्धा हळद लाभदायक ठरत असते. कारण चेहरा आणि त्वचेच्या इतर भागांवर असलेले अतिरीक्त तेल काढून टाकण्यास मदत होईल. त्यासाठी ओली हळद वाटून घ्या. त्यानंतर हळदीमध्ये दोन चमचे गुलाबपाणी घाला. ही पेस्ट २० मिनिटांपर्यंत चेहरा आणि मानेला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. या उपायामुळे तुम्हाला ऑईली स्कीन पासून सुटका मिळू शकते.