डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ, आयलायनर, आय शॅडो, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे डोळे अधिकच आकर्षक होतात. आय मेकअप करताना आय लायनरला विशेष महत्त्व असते. परंतु उन्हाळ्यामध्ये आयलायनर स्मज होण्याच्या समस्येचा सामना अनेक महिलांना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला आयलायनर स्मज न होण्यासाठी काही वॉटरप्रूफ टिप्स सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबाबत...
स्मज होत नाही आयलायनर
डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला जास्तीत जास्त ब्लॅक पेन्सिलचा वापर करतात. उन्हाळ्यामध्ये हे अनेकदा खराब होतं आणि वरच्या पापण्यांवर काजळ पसरतं. त्यामुळे आयलायनर ऐवजी आयशॅडोचा वापर करणं फायदेशीर ठरतं. आयशॅडो ऑयली आणि क्रिमी नसतं आणि स्मज होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे स्मज झालं तरि लूक खराब करत नाही.
वॉटरप्रूफ लिक्विड लायनर
वॉटरप्रूफ लिक्विड लायनरचा वापर करणं अनेक महिलांना आवडत नाही. परंतु उन्हाळ्यामध्ये वॉटरप्रूफ लिक्विड लायनरचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे लायनर स्मज होत नाही आणि लूकही खराब होत नाही.
आयशॅडोसोबत पेन्सिल लायनर
आयशॅडोसोबत पेन्सिल लायनर लावण्याची ट्रिक मेकअप आर्टिस्ट नेहमीच वापरतात. स्मजिंगपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पेन्सिल लायनर आयशॅडोसोबत एकत्र करून वापरू शकता. आयशॅडो पेन्सिल, आयलायनरचे ऑयली पिगमेंट्स लॉक करते. यासाठी तुम्ही छोट्या आणि बारिक ब्रशचा वापर करू शकता.
प्राइमर लावा
प्रायमर एक प्रोफेशनल मेकअप प्रोडक्ट मानलं जातं, जे त्वचा एकसमान करण्याचं काम करतं. त्याचबरोबर हे मेकअपचा बेस तयार करण्यासाठीही मदत करतं. प्रायमरमुळे मेकअप स्मज होत नाही. त्यामुळे जर तुम्ही डोळ्यांसाठी मेकअप करण्याचा प्लॅन करत असाल तर डोळ्यांच्या पापण्यांवर प्रायमर लावू शकता.
स्किन टोननुसार निवडा आयलायनर
सुंदर दिसण्यासाठी त्वचेचा रंग कोणताही असला तरिही फरक पडत नाही. पण तुम्ही मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करताना त्वचेचा रंग आणि प्रकार लक्षात घेणं गरजेचं असतं. आयलायनर निवडतानाही स्किन टोन लक्षात घेणं गरजेचं ठरतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.