अंधारात स्मार्टफोनचा अतिवापर, आंधळेपणाला निमंत्रण !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 2:43 PM
हल्ली प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो.
कोणत्याही कामासाठी त्याचा वापर केला जात आहे. परंतु, त्याचा अतिवापर हा आरोग्यास हानीकारक आहे. हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. रात्रीला अंधारात त्याचा अधिक वापर केल्याने आंधळेपण सुद्धा येऊ शकते. रात्रीला घरातील लाईट बंद करुन नियमीत स्मार्टफोनचा वापर केल्याने दोन महिलांना दृष्टी गमवावी लागली आहे. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसीनमध्ये आलेल्या एका वृत्तात दोन महिलांना प्रारंभी आंधळेपणाचे लक्षणे दिसून आले. त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता, स्मार्टफोनचा अंधारात अति वापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रात्रीच्या अंधारात स्मार्टफोनचा वापर न करण्याचे सांगितले. तरीही त्यांनी स्मार्टफोनचा वापर सुरुच ठेवला. त्यामुळे त्यांची संपूर्ण दृष्टी गेली . या स्मार्टफोनने कमी दिसणे हा एका आजार आहे. ट्रांजिएंट स्मार्टफोन ब्लाइंडनेस असे या आजाराचे नाव आहे. त्याकरिता रात्रीला स्मार्टफोन वापरताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यक आहे.