कॅन्सरने स्त्रियांच्या मृत्यू प्रमाणात घट !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2016 3:50 PM
एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
संततीप्रतिबंधक गोळ्यामुळे अंडाशयाच्या कॅन्सरने स्त्रियांचे मृत्यू होण्याचे प्रमाण हे कमी होत आहे. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या गोळ्यामुळे अंडाशयाच्या कॅन्सरपासून दीर्घकाळ संरक्षण मिळत असल्याचे इटालीतील मिलान विद्यापीठाचे प्रा. कालरे व्हेलिया यांनी सांगितले. २००२ ते २०१२ या काळात हे प्रमाण कमी झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.भविष्यात या कॅन्सरने मृत होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रजोनिवृत्तीच्या काळात संप्रेरक उपचार पद्धतीचा वापर व निदान तसेच उपचारांच्या नवीन पद्धतीमुळेही या कॅन्सरने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे प्रमाण अमेरिकेत १६, न्युझीलंड व आॅस्ट्रेलियात १२ टक्के कमी झाल्याच आपल्या अहवालात म्हटले आहे.