मसाल्याच्या पदार्थांचा विषय असेल आणि वेलचीचं नाव आलं नाही, असं अजिबात शक्य नाही. एखाद्या पदार्थाची चव वाढविण्यासाठी वेलचीचा वापर करण्यात येतो. चहाप्रेमींसाठी वेलचीचा चहा म्हणजे, जीव की प्राणच. याशिवाय वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. घशात होणारी खवखव आणि शरीराच्या इतर समस्यांवर उपाय म्हणून वेलची फायदेशीर ठरते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? वेलची जेवणाची चव वाढविण्यासाठी आणि आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे वेलची त्वचेसाठी वरदान ठरते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
पिंपल्स आणि डाग दूर करण्यासाठी
वेलचीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. जे चेहऱ्यावरील पिंपल्स, पूरळ ठिक करण्याचं काम करतात आणि डाग दूर करून त्वचा प्यूरिफाय करण्याचं काम करतात. तसेच त्वचेचा स्किन टोन ठिक करण्यासाठीही वेलची फायदेशीर ठरते.
असा करा वापर
एक चमचा वेलची पावडरसोबत मध एकत्र करा आणि चेहऱ्यावरील अॅक्ने असलेल्या ठिकाणी लावा. असं केल्याने वेलचीमध्ये असलेले अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी मदत करतात. तुम्ही ही पेस्ट पिम्पल्सवर लावून रात्रभरासाठी ठेवा. सकाळी उठून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. यामुळे चेहऱ्यावरील लाल चट्टेही दूर होतात. तसेच त्वचा हाइड्रेटेड दिसण्यासही मदत होते.
रक्त स्वच्छ करून, अॅलर्जी दूर करण्यासाठी
वेलचीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी आढळून येतं. तसेच अॅन्टीऑक्सिडंटही असतात. याशिवाय शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी वेलची मदत करते. तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठीही वेलची मदत करते. वेलचीमध्ये असलेले अॅन्टीसेफ्टिक आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म स्किन अॅलर्जीमध्ये फायदेशीर ठरतात. जर तुम्ही वेलचीचं सेवन करत असाल, तर शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो दिसून येतो.
ब्यूटी स्लीपमध्ये फायदेशीर
वेलचीचा गंध नर्व्सला आराम देण्यासोबतच स्ट्रेस बस्टरप्रमाणे काम करतो. शांत आणि पूर्ण झोप हेल्दी स्किनसाठी अत्यंत आवश्यक असते. जर तुम्ही रात्रभरासाठी चांगली झोप घेत असाल तर सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमची स्किन रिलॅक्स आणि ग्लोइंग दिसण्यास मदत होते. अशातच वेलचीचा गंध तुमचा मूड उत्तम करण्यासोबतच डल आणि थकलेली त्वचा चमकदार आणि हेल्दी करण्यासाठी मदत करते.