आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतं. त्यासाठी ब्युटी पार्लर ट्रिटमेंटपासून ते बाजारात मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा आधार घेतात. महागड्या पार्लर ट्रिटमेंटमुळे अनेकदा साइड इफेक्ट्स होण्याचा धोका असतो. अनेकदा स्कीन ड्राय होण्याचाही धोका असतो. अशा ड्राय स्कीनवर चॉकलेट फायदेशीर ठरते. चॉकलेटपासून तयार करण्यात आलेले फेस पॅक वापरल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व आढळतात. जे ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
1. चॉकलेटचे फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये एक चमचा कोको पावडर घ्या. त्यामध्ये मध आणि क्रीम मिक्स करून एकत्र करून घ्या. आता हे आपल्या चेहऱ्यावर अर्धा तासासाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एकदा या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचा उजळण्यास मदत होईल.
2. त्वचा मुलायम बनवण्यासाठी चॉकलेट फायदेशीर असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुण अस्तित्त्वात असतात. जे त्वचा मुलायम बनवण्यासाठी फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त डार्क चॉकलेट रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कंट्रोल करण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचा नितळ होते तसेच चेहऱ्यावर उजाळा येतो.
3. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा डाग असतील तर त्यावर उपाय म्हणून कोको पावडर, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने त्वचा मुलायम होते त्याचप्रमाणे तिची लवचिकता देखील वाढते.
4. स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर करण्यासाठीदेखील चॉकलेटचा वापर करता येतो. चॉकलेटमध्ये लिलोलियम अॅसिड अस्तित्वात असतं. जे त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. स्ट्रेच मार्क्सवर डार्क चॉकलेट लावल्यानं स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर होते.