हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते. अशातच त्वचा हायड्रेट करणं फार गरजेचं असतं. अन्यथा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी अनेकदा आपण मॉयश्चरायझर, लोशन किंवा क्रिम्सचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? क्रिम किंवा लोशन तुमच्या स्किन टाइपनुसार निवडण्याची गरज असते. जर स्किन टाइपनुसार याचा वापर केला नाही तर त्वचेसाठी हे नुकसानदायक ठरतं. जाणून घेऊया थंडीमध्ये कोणत्या स्किन टाइपनुसार, कोणत्या क्रिम्सचा वापर करावा.
स्किन टाइपनुसार निवडा क्रिम्स :
ड्राय स्किन :
ड्राय स्किन असणाऱ्यांना थंडीमध्ये त्वचेच्या, केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. थंड वातावरण आणि थंड हवेमुळे त्वचा आणखी कोरडी होते. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही जास्त मॉयश्चराइझिंग तत्व असणाऱ्या क्रिमचा वापर करा.
ऑयली स्किन :
जर तुमची स्किन ऑयली असेल तर तुम्हाला हेवी मॉयश्चराइझ क्रिमऐवजी लाइट आणि कमी ऑइल असणाऱ्या क्रिमचा वापर करणं गरजेचं असतं. यामुळे तुमची त्वचा जास्त कोरडी किंवा ऑयली दिसणार नाही.
सेंसिटिव स्किन :
सेंसिटिव स्किन असणाऱ्यांनी त्वचेसाठी कोणतंही प्रोडक्ट वापरण्याआधी काळजी घ्यावी. कारण या प्रकारच्या स्किनसाठी सगळेच प्रोडक्ट सूट होत नाहीत. अनेकदा अॅलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे थंडीमध्ये त्वचेसाठी क्रिम वापरताना विशेष काळजी घ्या. सेंसिटिव स्किन असणाऱ्या लोकांनी जास्त गंध असणाऱ्या क्रिम्सचा वापर करणं टाळलं पाहिजे.
नॉर्मल स्किन :
नॉर्मल स्किन असणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे मॉयश्चरायझरयुक्त क्रिम्स. पण त्यामध्ये मॉयश्चरायझर किंवा क्रिम जास्त असू नये. नाहीतर स्किन ऑयली दिसेल. कदाचित त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.