निरोगी आरोग्यासाठी शहर नियोजनही महत्वाचे !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 3:31 PM
शहराचे नियोजन हे चांगल्याप्रकारे केलेले असेल तर आजाराचे प्रमाण हे कमी असते
आरोग्य व शहर नियोजन यांचा काय संबंध असे आपल्याला वाटत असेल! परंतु, उत्तमप्रकारे शहराचे नियोजन असेल तर तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य हे निरोगी असते. ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये शहराचे नियोजन हे चांगल्याप्रकारे केलेले असेल तर त्यांना आजाराचे प्रमाण हे कमी असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याकरिता शहराचे नियोजन नागरिकांचे आरोग्य समोर ठेवून झाले पाहीजेत.त्यासाठी बाजारपेठ, शाळा - महाविद्यालये, नोकरी व व्यवसायाचे ठिकाणे हे पायी चालत पोहोचता येतील या अंतरावर असावी. ही व्यवस्था पायी चालण्याच्या अंतरावर असली तर त्यामुळे वाहने वापरण्याची गरज पडणार नाही. त्याचा फायदा नागरिकांचे पायी चालल्याने व्यायाम होतो व त्याचबरोबर अपघाताचाही धोका राहत नाही. तसेच प्रदूषणाचाही धोका टाळता येतो. असे विविध प्रकारचे फायदे हे शहर नियोजनाचे आहेत. हे संशोधन प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वाचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे.