त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे CTM फॉर्म्युला. तुम्ही नक्कीच विचारात पडला असाल की, नक्की हा फॉर्म्युला आहे तरी काय? हा फॉर्म्युला म्हणजे, क्लींजिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग होय. जर तुम्ही हा फॉर्म्युला फॉलो करण्याचा विचार करत असाल तर, सर्वात आधी तुम्हाला त्वचेचा प्रकार ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानंतरच हा फॉर्म्युला अप्लाय करा. आज आम्ही तुम्हाला ड्राय स्किनसाठी हा फॉर्म्युला कसा अप्लाय करावा त्याबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी काही खास टिप्स...
CTM फॉर्म्युला ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरतो त्याबाबत जाणून घेऊया...
क्लींजिंग
चेहरा स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु ड्राय स्किन असणाऱ्यांनी त्वचेसाठी वापरणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर करताना सावध राहणं गरजेचं असतं. कारण जर तुम्ही चुकीच्या प्रोडक्टचा वापर केला तर त्यांची त्वचा आणखी डॅमेज होऊ शकते. त्यामुळे फेस क्लिन करण्यासाठी अशा फेसवॉश निवडा, ज्यामध्ये साबण नसेल किंवा असला तरिही माइल्ड सोपचा वापर केलेला असेल.
सध्या बाजारामध्ये फोम बेस्ड आणि क्रीम बेस्ड फेल क्लीनरही उपलब्ध आहेत. जे मॉयश्चर टिकवून ठेवतात आणि फेस क्लिनही करतात. त्यामुळे तुमच्या स्किन टाइपनुसार फेसवॉश निवडा आणि जवळपास एक मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर क्लॉक वाइज आणि अॅन्टी क्लाकवाइज स्क्रब करा. यामुळे स्किनवरील इम्प्युरिटी व्यवस्थित क्लीन होण्यास मदत होते.
टोनिंग
सध्या अनेक महिला सर्रास टोनरचा वापर करतात. पण अनेक महिला अशाही आहेत ज्याचा वापर करणं गरजेचं आहे. ड्राय स्किनसाठी बाजारामध्ये खास टोनर उपलब्ध आहेत. जे त्वचेची पीएच लेव्हल कंट्रोल करून मॉयश्चर लॉक करण्यासाठी मदत करतात. हे स्किन आणखी ड्राय होऊ देत नाही. टोनर तुम्ही कॉटन पॅड किंवा कॉटन बॉलच्या मदतीने अप्लाय करू शकता. याशिवाय थोडंसं टोनर हातावर घेऊन चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेमध्ये अब्जॉर्ब होतं.
मॉयश्चरायझिंग
क्लीनिंग आणि टोनिंग केल्यानंतर स्किन मॉयश्चरायझ करायला विसरू नका. ड्राय स्किन असणाऱ्यांना मॉयश्चरायझिंगची गरज जास्त असते. त्यामुळे त्यांना असं मॉयश्चरायझर घेण्याची गरज असते, जो स्किन डिपली मॉयश्चराइझ करतो. बाजारामध्ये खास क्रिम्स अस्तित्वात आहेत, ज्या फक्त ड्राय स्किनसाठीच असतात. तुम्हीही यापैकी एक निवडू शकता.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.