उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त परिणाम हा त्वचेवर होत असतो. कारण सूर्याची किरणं सरळ त्वचेवर पडत असतात. सूर्याची प्रखर किरणं त्वचेसाठी हानिकारक असतात. अशातच बाहेर जाण्याआधी त्वचेवर थेड सूर्याची किरणं पडणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही स्कार्फचा वापर करू शकता किंवा सनस्क्रिन वापरू शकता. याव्यतिरिक्त काही नॅचरल पॅक असतात, जे त्वचेला उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुम्हीही उन्हाळ्यामध्ये तुमच्या त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी हे पॅक वापरू शकता.
टरबूज आणि दही
ताजं दही आणि टरबूज त्वचेसोबतच शरीरासाठीही लाभदायक असतं. कारण यांमध्ये अस्तित्वात असलेली पोषक तत्व त्वचेला पोषण देतात आणि समस्यांपासून दूर ठेवतात. दही आणि टरबूज व्यवस्थित कत्र करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर धुवून टाका.
लिंबाचा रस आणि कोरफड
लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. हा पॅक तयार करण्यासाठी कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस एकत्र करा आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र करा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासाने धुवून टाका.
पुदिना आणि मुलतानी माती
पुदिना आणि मुलतानी मातीमध्ये कूलिंग प्रॉपर्टिज असतात. ज्या त्वचेवर होणारी जळजळ कमी करतात. ही पेस्ट तयार करण्यासाठी पुदिन्याची काही पानं वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट मुलतानी मातीसोबत एकत्र करा. आता ही पेस्ट संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. थोडा वेळ सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका.
गुलाब पाणी आणि चंदन
त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि त्वचा उजळवण्यासाठी चंदनाचा वापर अनेक काळांपासून होत आहे. तसेच गुलाब पाणी चेहऱ्याला फ्रेश लूक देण्यासाठी मदत करतो. 2 चमचे चंदनाची पावडर गुलाब पाण्यामध्ये एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. जेव्हा ही पेस्ट सुकून जाईल त्यानंतर पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.