कोरोनाचा व्हायरसपासून बचाव करता यावा आणि प्रादूर्भाव होऊ नये यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. सतत हात स्वच्छ धुण्याासाठी आवाहन केलं जातं. त्यामुळे सॅनिटायजरचा वापर करून आणि साबणाचा वापर करून अनेकांचे हात कोरडे पडले आहेत. हात कोरडे पडल्यामुळे खाज येणं, त्वचेवर साल येणं अशा समस्या उद्भवत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरडे पडलेले हात सॉफ्ट करण्य़ासाठी काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही हात चांगले ठेवू शकता.
तेलाने मसाज करा
अनेकदा साबण आणि पाण्याच्या सतत संपर्कात आल्यामुळे हात कोरडे पडत असतात. यावर उपाय म्हणून हातांची मसाज तेलाने करा. २ मिनिटांपर्यंत मसाज करत रहा. तुम्ही राईच्या तेलाचा वापर करून सुद्धा हाताची मसाज करू शकता.
दुधाची साय
अनेक लोक आपल्या त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी केमिकल्सच्या वापरापेक्षा दुधाच्या सायीचा वापर करत असतात. तुमचे हात कोरडे पडले असतील तर दुधाची साय हातावर चोळा. त्यानंतर हात स्वच्छ धुवा. त्यामुळे तुमचे हात मऊ मुलायम होण्यास मदत होईल
बॉडी लोशन
हातापायांना मऊ ठेवण्यासाठी अंघोळीनंतर हातापायांना बॉडी लोशन लावून मग कोणत्याही कामाला सुरूवात करा. त्यामुळे त्वचेचा मऊ आणि मुलायमपणा टिकून राहील.
एलोवेरा
एलोवेरा हे एक नैसर्गिक मॉईश्चराईजर आहे, जे त्वचेतील आर्द्रता कायम ठेवण्यास मदत करतं. एलोवेरा हे डेड स्कीन सेल्सना मुलायम करून त्वचा खूपच मऊ बनवण्यात सहायक ठरतं. अँटी ऑक्सीडंट गुण त्वचेला कोरडं होण्यापासून वाचवतात आणि त्वचेची नैसर्गिक चमकही कायम ठेवतात. ( हे पण वाचा-त्वचेवरील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सुट्टीचा फायदा 'असा' करून घ्या....)
गुलाबपाणी
आपल्या हातापायांना सॉफ्ट बनवण्यासाठी १ चमचा गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिक्स करून हातांना लावा. रोज गुलाबपाणी आणि ग्लिसरीनचा वापर हातांवर कराल तर त्वचा चांगली राहील. ( हे पण वाचा- पैसै होतील वसूल, जर आकर्षक सनग्लासेस 'या' टिप्स वापरून खरेदी कराल)