स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिऱ्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे जिरं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसं पाहायला गेलं तर स्वयंपाक घरात एखाद्या पदार्थाची चव वाढविण्यासाठी जिऱ्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? स्वयंपाक घरात हमखास सापडणारं जीरं पदार्थांची चव वाढविण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरंत. एवढचं नाहीर हे जीरं सौंदर्य वाढविण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं.
जिऱ्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असून यामध्ये आढणारं व्हिटॅमिन ए आणि ई त्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया जिऱ्याचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्याची पद्धत...
असा तयार करा फेसपॅक...
जिऱ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा जीरं बारिक करून त्यामध्ये थोडसं दूध किंवा पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. त्यामुळे या फेसपॅकचा वापर आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.
जिऱ्याचा फेसपॅक वापरण्याचे फायदे...
- जिऱ्यामध्ये असणारं व्हिटॅमिन ई, सी आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स त्वचेच्या समस्या दूर करून त्वचेचं रक्षण करतात.
- जिऱ्याचा फेसपॅख चेहऱ्यावरील डाग दूर करून पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतात.
- त्वचेवरील इन्फेक्शनची समस्या दूर करण्यासाठी जिऱ्याचा फेसपॅक मदत करतो.
- जिऱ्याचं नियमितपणे सेवन केल्याने त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात.
- जिऱ्यामध्ये असलेली पोषक तत्व एजिंगची प्रक्रिया कमी करतात आणि सुरकुत्यांसोबतच इतर त्वचेच्या समस्या दूर करतात.
- जिऱ्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग होते.
- जिऱ्याची पेस्ट त्वचेमधील एक्स्ट्रा ऑइल काढून टाकण्यास मदत करते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)