कीटकनाशकांच्या हवाई फवारणी धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2016 7:00 PM
त्या भागात वाढणाऱ्या मुलांच्या वाढीसाठी अतिशय घातक ठरू शकते असा निष्कर्ष नव्या रिसर्चमधून काढण्यात आला आहे.
विस्तृत भागात कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी विमानाद्वारे फवारणी (एरिअल स्प्रेर्इंग) केली जाते. परंतु असे करणे त्या भागात वाढणाऱ्या मुलांच्या वाढीसाठी अतिशय घातक ठरू शकते असा निष्कर्ष नव्या रिसर्चमधून काढण्यात आला आहे.डासांचा मारणाऱ्या कीटकनाशकांची हवाई फवारणी केल्यामुळे त्या भागातील मुलांमध्ये आॅटिजम स्पेक्ट्रम डिसआॅर्डर आणि वाढीसंबंधीच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे कीटकनाशकांच्या वापराला त्वरीत दुसरा पर्याय निर्माण करण्याचा संशोधकांनी सल्ला दिला आहे.2003 पासून प्रत्येक उन्हाळ्यात हवाई फवारणी केलेल्या भागात वाढेलेल्या मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा (आॅटिजम) किंवा त्यांच्या वाढीमध्ये उशिर होण्याचे प्रमाण इतर भागांच्या तुलनेत अधिक दिसून आले. कीटकनाशकांची फवारणी करण्याच्या इतर पद्धती वापरण्यात येणाºया भागातील मुलांच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी जास्त आहे.प्रमुख संशोधक स्टिव्हन हिक्स म्हणतात की, कीटकनाशके फवावरणीच्या पद्धतीचा मुलांच्या आरोग्यावर कशाप्रकारे परिणाम होतो याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. डास मारणारे ‘एन्सिफॅलिटिस’ कीटकनाशकाचा सर्वाधिक प्रभाव पडतो.