जर्म्समुळेसुद्धा होतो मधुमेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2016 2:42 PM
एका नव्या संशोधनानुसार टाईप-१ मधुमेह होण्यामागे जर्म्ससुद्धा कारणीभूत असतात.
मधुमेही ही फार गंभीर जागतिक समस्या आहे. मधुमेह होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातच आता आणखी एका नव्या कारणाविषयी खुलासा झाला आहे.एका नव्या संशोधनानुसार टाईप-१ मधुमेह होण्यामागे जर्म्ससुद्धा कारणीभूत असतात. टाईप-१ मधुमेह अत्यंत गंभीर स्वरुपाचा आजार असून वयाने लहान किंवा तरुणांना याची सर्वात जास्त लागण होते.शरीरात असणाºया टी-सेल्स या पांढºयापेशी आपल्याला जंतांपासून वाचवित असतात. मात्र जेव्हा हे टी-सेल्स इन्सुलिन निर्माण करणाºया पेशींना (बिटा सेल्स) नष्ट करतात तेव्हा टाईप-१ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.कार्डिफ विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक अँडी सिवेल यांनी माहिती दिली की, काही विशिष्ट प्रकारचे जंतू टी-सेल्सला इन्सुलिन निर्मिती करणाºया बिटा पेशीवर हल्ला करण्यास भाग पाडतात. आमच्या संशोधनातून टी-सेल्स कशा प्रकारे किलर पेशी बनतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जेव्हा बिटा पेशी नष्ट होतात तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांना रोजच्या रोज इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते.