(Image Credit: www.pinterest.co.uk)
प्रत्येकालाच नेहमीसाठी तरुण दिसावं अशी इच्छा असते. त्यासाठी लोक वेगवेगळे उपाय सतत करत असतात. माणसं वाढतं वय हे त्याच्या शरीर आणि त्वचेवर दिसायला लागतं. त्यामुळे हेल्दी डाएट फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला पाच असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.
1) गाजराचा ज्यूस
तसे तर गाजर तुम्ही कच्चे आणि भाजी म्हणूनही खाऊ शकता. पण तसे कमी खाल्ले जाते. त्यामुळे गाजराच्या ज्यूसचा डाएटमध्ये समावेश करा. यातील पोटॅशिअम आणि आयर्नच्या अधिक प्रमाणामुळे रक्त आणि स्कीन चांगली राहते.
2) बीटाचा रस
आयर्नसाठी बीट हे फार चांगले फळ आहे. त्यासोबतच यात अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक रक्त निर्मिती करणे, त्वचा तजेलदार ठेवणे यासाठी या बीटाचा ज्यूस फार उपयोगी आहे.
3) मोसंबीचा ज्यूस
मोसंबीचा ज्यूस बाराही महिने मिळू शकतो. यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी ऑक्सीडेंट आढळतात. या तत्वांमुळे शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून सुरक्षा होते. मोसंबीचा ज्यूस रक्तीसाठीही चांगला असतो.
4) संत्र्याचा ज्यूस
संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस सामिल करा. या ज्यूसमुळे पचनक्रियाही चांगली होते.
5) डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबाच्या फायद्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. नेहमी आजारी पडल्यावर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं त्यामुळे याचा फायदा त्वचेला होतो. त्यासोबत याने रक्तही शुद्ध राहतं.