वॅक्सिंगबाबत लोकांना अनेक गोष्टी माहीत असूनही अनेक चुका केल्या जातात. तसेच कोणतं वॅक्सिंग जास्त योग्य आणि कोणतं वाईट असाही एक प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. बाजारात सामान्यपणे दोन वॅक्स असतात. तसा तर दोन्ही वॅक्समध्ये मेणयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. पण एक हॉट वॅक्स तर दुसरं कोल्ड वॅक्स नावाने ओळखलं जातं. अनेकांना हे माहीत नसतं की, कोणत्या वातावरणात कोणतं वॅक्स जास्त योग्य ठरेल. नको असलेले केस दूर करण्यासाठी वॅक्सिंगचा वापर महिला अधिक करतात. तसा आता याचा वापर पुरुषांमध्येही वाढत आहे. पण आता प्रश्न हा उभा राहतो की, यातील कोणतं वॅक्स अधिक चांगलं असतं. चला जाणून घेऊ यांच्या फायद्या आणि नुकसानाबाबत....
हॉट वॅक्सिंग काय आहे?
(Image Credit : www.thebrazilianhotwaxcompany.co.uk)
हॉट वॅक्सिंगमध्ये वॅक्स गरम केलं जातं आणि शरीराच्या ज्या भागातील केस काढायचे आहेत तिथे लावलं जातं. गरम वॅक्स लावल्यानंतर कपड्याच्या मदतीने दाबलं जातं आणि जेव्हा ते हार्ड होऊ लागतं तेव्हा केसांच्या उलट्या दिशेने ते ओढलं जातं.
हॉट वॅक्सिंगचे नुकसान
(Image Credit : Love U Salo)
या वॅक्सिंगमध्ये वॅक्स पुन्हा पुन्हा गरम करावं लागतं. तसेच हे फार जास्त वेदनादायक असतं. जास्त गरम वॅक्स लावल्याने हातावर भाजू शकतं किंवा रॅशेस येऊ शकतात. हे वॅक्स ओठांवर किंवा भुवयांवर लावता येत नाही.
कोल्ड वॅक्सिंग काय आहे?
(Image Credit : Mukda Thai Spa)
कोल्ड वॅक्सिंगमध्ये वॅक्स थेट शरीरावर लावलं जातं किंवा हे वॅक्स एका स्ट्रिपमध्ये आधीच लावलेलं येतं. हे शरीरावर लावलं जातं आणि उलट्या दिशेने ओढलं जातं. त्या जागेवरील केस निघतात. एकदा वापरूनच याचा फायदा बघायला मिळतो. याचा वापर पुन्हा पुन्हा करावा लागत नाही.
कोल्ड वॅक्सिंगचे फायदे
ही फार सोपी प्रक्रिया आहे. यात वॅक्स गरम करण्याची गरज नाही. तसेच हे वॅक्सिंग हॉट वॅक्सिंगच्या तुलनेत कमी वेदनादायी असतं. याच्या स्ट्रिप्स वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या असतात. या स्ट्रीप शरीराच्या कोणत्याही अंगासाठी वापरल्या जाऊ शकतात.
(Image Credit : Waxfiguresforsale.com)
कोल्ड वॅक्सिंगचे नुकसान
ही प्रक्रिया पुन्हा पुनहा करावी लागते. तसेच एकदा अपेक्षित फायदा होईलच असेही नाही. याचा पुन्हा पुन्हा एकाच जागेवर उपाय केल्याने शरीरावर लाल चट्टे किंवा सूज येऊ शकते.
टिप : वरील केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.