अनेकदा धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीमुळे अनेक लोकांमध्ये तणावाची लक्षणं दिसून येतात. जर तुम्हाला एकटं वाटतं असेल आणि ते तुमच्या चेहऱ्यावरूनच समजत असेल तर त्यावर वेळीच काहीतरी उपाय करणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फार अस्वस्थ वाटत असतं. ज्यामुळे तुमच्या कामांवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. तणाव कमी करण्यासाठी अशा गोष्टींची निवड करा ज्यामुळे तुमचा तणाव दूर होऊन तुम्हाला थोडं बरं वाटेल. काहीतरी असं करा ज्यामुळे फक्त तुम्हाला चांगलं वाटणार नाही तर त्यामुळे तुमचं टेन्शन दूर होण्यासही मदत होईल. आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचा तणाव दूर करू शकता. तसेच तुमचं मन बदलून एखाद्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमवू शकता. जाणून घेऊयात तुमचं मन प्रसन्न करण्यासाठी फायदेशीर ठरणारे काही उपाय...
मसाज करा
केळी, पपई, संत्री किंवा इतर फळं. तुम्ही कोणत्याही फळाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर मसाज करू शकता. 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळण्यासोबतच तुमचं मन प्रसन्न होण्यासही मदत होते.
मेनिक्योर
तणावापासून दूर राहण्यासाठी मेनिक्योर हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुमचं मन बदलण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या आठवणींमध्ये रमून हातांना मेनिक्योर करू शकता. मेनिक्योर केल्यामुळे तुमचा हात सुंदर दिसण्यास मदत होईल.
तयारी करा
तुमचा ताण दूर करण्यासाठी आणि सुदर दिसण्यासाठी तुम्ही तयारी करू शकता. म्हणजेच, एखादी पार्टी, लग्न किंवा कोणासोबत डेटवर जाण्याचा प्लॅन करू शकता. नवीन ड्रेसला मॅचिंग असा मेकअप करून तुम्ही हटके लूक करू शकता.
चेहऱ्यावर स्माइल ठेवा
कधी कोणाशी वाद झाले तर त्यावेळी चते वाढू न देता शांत करण्याता प्रयत्न करा. चेहऱ्यावर सतत स्माइल ठेवा, त्यामुळे तुमचा ताण आणखी वाढणार नाही. तसेच भाडणांमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत दुरावा येणार नाही. दोघांमध्ये असलेले गैरसमज बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला नाही तर ते भांडण आणखी वाढेल आणि तुमच्या तणावामध्ये वाढ होईल.