शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

Diwali 2020 : ना पार्लरची झंझट ना पैश्यांची कटकट; दिवाळीसाठी घरच्याघरी 'असं' करा क्लिनअप, फेशियल

By manali.bagul | Published: November 12, 2020 4:16 PM

Beauty Tips in Marathi : कोरोनाकाळात पैसे आणि वेळ वाचवून अगदी सुरक्षितरित्या तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता. आम्ही तुम्हाला घरच्याघरी फेशियल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

दिवाळीला काही दिवस उरले असताना घराघरातील महिलांची लगबग सुरू असते. आधी साफसफाई, मग फराळ, त्यात शॉपिंगला जायची घाई, घरातील माणसांना, लहान मुलांना कपडे घेऊन द्यायचे. फटाक्याचा हट्ट पुरवायचा. अशी अनेक काम असतात. ज्या स्त्रिया कामाला जातात त्यांना या सगळ्यासाठीसुद्धा वेळ नसतो. कारण कामावरून थकून घरी आल्यानंतर जेवढं जमले तेव्हढं करायचं, बाकीचं नंतर बघू. अशी सगळ्यांची रिएक्शन असते. या सगळ्यात महिलांना आपल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पार्लरला जायचं म्हटलं तर खर्च तर होणारचं पण हवा तसा ग्लो सुद्धा मिळायला हवा. कोरोनाकाळात पैसे आणि वेळ वाचवून अगदी सुरक्षितरित्या तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता. आम्ही तुम्हाला घरच्याघरी फेशियल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

फ्रूट फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायद्याचं ठरते. फ्रूट फेशियल फक्त कोणत्याही क्रीमवर अवलंबून नसते. तर ताज्या फळांनीदेखील फ्रूट फेशियलमध्ये मसाज करता येऊ शकतो. ताज्या फळांनी मसाज करताना तुम्ही तुमच्या त्वचेला लागू होत असेल असेच फळ निवडावे. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी केळं, तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी संत्र, अगदीच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी स्ट्रॉबेरी आणि पिगमेंटेशन असणाऱ्या त्वचेसाठी पपई वापरावी.

तुम्हाला या फळांचा अगदी जसाच्या तसा वापर करायचा नसल्यास, बाजारामध्ये या फळांचेच फ्रूट फेशियल क्रीमदेखील उपलब्ध असते. क्लिन्झिंग  मिल्कने ५ ते १० मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा कापसानं पुसावा. त्यानंतर मसाज क्रीम  लावून १५ मिनिटं मसाज करावी.फेशियल करताना पहिले तुमचे केस बांधून घ्या. यासाठी तुम्ही हेअरबँडदेखील वापरू शकता. जेणेकरून तोंडावर केस येणार नाहीत. सर्वात पहिल्यांदा चेहरा साफ करण्यासाठी क्लिन्झिंग करावे. घरी क्लिंजर बनविण्यासाठी एका वाटीत २ चमचे दही आणि १ चमचा मध घ्यावा. आता चेहऱ्यावर हा लेप लावून कमीत कमी ५ मिनिट ठेवावे. त्यानंतर चेहरा साफ करून घ्यावा किंवा तुम्ही आयुर,विट्रो या कंपनीचे क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता. 

त्यानंतर स्क्रब करावं लागेल. घरी स्क्रबर बनविण्यासाठी एक केळं मिक्सरमध्ये १ चमचा दूध, दोन चमचे ओट्स आणि एक चमचा मधाबरोबर वाटून घ्यावे. आता हे तुमच्या चेहऱ्यावर १० मिनिट्सपर्यंत हळूहळू स्क्रब करत राहावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची छिद्र उघडली जातात. त्यानंतर मॉईस्चराईजर त्वचेच्या आत जाऊन त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते. स्क्रबिंगनंतर वाफ घ्या.  स्टिमर नसेल  तर तुम्ही गरम पाणी एका पातेल्यात गरम करून वाफ घेऊ शकता. वाफ घेऊन झाल्यानंतर स्वच्छ टॉवेलनं चेहरा पुसून घ्या. त्यानंतर मसाज क्रिम लावून योग्य दिशेनं त्वचेची मसाज करा. मसाज झाल्यानंतर फेसपॅक लावण्याची वेळ येते.

Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

केळी आणि पुदीन्याची पाने चांगल्याप्रकारे एकत्र करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक तुम्हा आठवड्यातून दोनदा वापरू शकता.  पुदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अॅसिड आढळतं, ज्याने पिंपल्स दूर होतात. तर लिंबू चेहऱ्यावर एकप्रकारे ब्लीचिंगचं काम करतं.पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग झाले असतील तर हा लिंबू आणि पुदीन्या फेसपॅक त्या डागांना कमी करण्याचं काम करतो.

कसा कराल तयार?

लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी १० ते १२ पुदीन्याची पाने घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करा. ही पाने चांगली बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर काही वेळासाठी लावून ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यावर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून २ वेळा लावू शकता. Govatsa Dwadashi 2020: घरात गाय किंवा वासरू नसताना आज कशी साजरी कराल वसु बारस?; वाचा फक्त एका क्लिकवर

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सDiwaliदिवाळीWomenमहिला