आपलं सौंदर्य वाढविण्यात केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. पण अनेकदा केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी केसांची काळजी कशी घ्यावी? याबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आपले केस प्रत्येक वेळी सुंदर आणि मॅनेजेबल दिसण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. परंतु दररोज केस धुतल्यामुळे केसांचं आरोग्य बिघडतं. परिणामी केस कोरडे होतात आणि गळतात. केस दररोज धुणं शक्य नाही. परंतु काही टिप्सच्या मदतीने तुम्ही केसांना मॅमेजेबल आणि सुंदर ठेवू शकता. जाणून घेऊया केस दररोज न धुताही आकर्षक आणि मुलायम राहण्यासाठी मदत करणाऱ्या टिप्स...
केस न धुता मॅनेज कसे कराल?
- ड्राय शॅम्पू एक चांगला ऑप्शन आहे. केस नेहमी मुलायम ठेवण्यासाठी केसांमध्ये ड्राय शॅम्पू लावा आणि त्यानंतर थोडं लाबूंन त्यावर स्प्रे करा. काही वेळ असचं राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने ब्रश करा. यामुळे केस चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होइल.
- केस धुण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला लगेच एखाद्या पार्टीसाठी जायचं असेल तर हटके स्टाइल पोनीटेल बांधा. त्यामुळे तुम्हाला स्टायलिश लूकसोबतच केस मॅनेज करणंही सोपं जाइल.
- याव्यतिरिक्त केसांना बॅक कोम्बिंग करूनही न धुतलेले केस मॅनेज करणं शक्य आहे.
- केसांचं पार्टिनशन बदलूनही तुम्ही केसांना वेगळा लूक देऊ शकता. त्यामुळे केसांना वॉल्यूम मिळेल आणि केस सुंदरही दिसतील.
केसांना घाम येण्यापासून वाचवा :
- केसांना घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी अनेक प्रकारच्या हेअर पॅक्सचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. दही एक नॅचरल कंडीशनर आहे. यापासून बचाव करण्यासाठी एक वाटी दही, दोन चमचे मध एकत्र करा. तयार पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्धा तासासाठी हा पॅक केसांना लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.
- याव्यतिरिक्त एका बाउलमध्ये 3 चमचे दही, 3 चमचे मेथी पावडर, 2 चमचे कांद्याचा रस एकत्र करून लावा. त्यानंतर एक तासाने धुवून टाका. असं आठवड्यातून दोनदा केल्याने डोक्याला येणारी खाज दूर होते आणि होणाऱ्या त्रासापासून तुमची सुटका होइल.
- केसांमध्ये येणाऱ्या घामाच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी कोको पॅकचाही वापर करू शकता. दोन चमचे दही, एक टेबलस्पून कोको पावडर, एक टेबल स्पून मध आणि एक चमचा कॉफी एकत्र करा. तयार पेस्ट केसांच्या मुळांना लावा. एक तासानंतर केस धुवून टाका.