डॉक्टरांकडे न जात ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2016 4:31 PM
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याची ही खास माहिती
ब्लड प्रेशरच्या समस्याने आजघडीला अनेजण त्रस्त असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही आपण ते नियंत्रणात ठेवू शकतो, त्याची ही खास माहिती आपल्यासाठी.१ दररोज सात तास झोपावे : जे पाच तास किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ झोप घेतात, त्यांना हाय ब्लेड प्रेशरची समस्या उद्भवते हे संशोधनातून समोर आले आहे. त्याकरिता दररोज सात झोप घ्यावी असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.२ कमी मीठ खावे : मीठ हे शरीरात अधिक पाणी वाढविण्याचे काम करते. शरीरात अधिक प्रमाणात पाणी वाढले तर ब्लेड प्रेशर वाढण्याचा मोठा धोका आहे.३ आठवड्यातून १५० मिनिटे एक्सरसाईज : ब्लड प्रेशरला दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटे एक्सरसाईज करावी. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.४ दररोज दहा मिनिटे मेडिटेशन : तणावामुळे मानवाच्या शरीरातून एड्रेलिन नावाचा एक हार्मोन निघतो. तो हृदयाचे ठोके व ब्लड प्रेशर वाढविण्याचे काम करतो. त्याकरिता तणावातून सुटण्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्वाचे आहे. दिवसभरात दहा मिनिटेही मेडिटेशन केले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येते.५ भाज्या व फळाचे सेवन : आपल्या जेवणामध्ये भाज्या व फळाचे सेवन अधिक असेल तर ब्लड प्रेशरच्या समस्यापासून दूर राहता येते. हापरटेंशनच्या रूग्णांसाठी फळे खाणे हे खूप उपयुक्त आहे.६ वजन : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचे असेल तर याकरिता वजनही अगोदर नियंत्रणातच असावयाला हवे. आपल्या उंचीनुसार वजन असणे आवश्यक आहे.