महिला आपलं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक पार्लर ट्रिटमेंट्सचा वापर करण्यात येतो. यामध्ये सर्वात प्रामुख्याने करण्यात येणारी ट्रिटमेंट म्हणजे फेशिअल. फेशिअल केल्यानं चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार बनतो. पण फेशिअल केल्यानंतर अनेक महिला काही चुका करतात त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या गोष्टी फेशिअल केल्यानंतर शक्यतो टाळाव्यात.
1. फेशिअल केल्यानंतर कमीत कमी 4 तासांपर्यंत आपल्या चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉश लावू नये. असे केल्यानं त्वचेवर रिअॅक्शन होऊ शकते. तसेच फेशिअल केल्यानंतर आपला चेहरा पाण्याने धुवून घ्या.
2. फेशिअल केल्यानंतर त्वचेची रोम छिद्रं उघडतात. त्यामुळे उन्हात जाणं शक्यतो टाळावं. कारण त्वचेला रिअॅक्शन होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
3. जर तुम्ही फेशिअल केलं असेल तर कमीत कमी ४ दिवसांपर्यंत त्वचेवर स्क्रब करू नका. फेशिअल केल्यानं त्वचेवरील सर्व घाण निघून जाते. तसेच त्वचेवरील मृत पेशीही निघून जातात. त्यामुळे त्याजागी नवीन पेशी तयार होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात. अशात स्क्रब केल्यामुळे त्वचेला इजा पोहचू शकते.
4. फेशिअल केल्यानंतर 1 आठवड्यापर्यंत आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही फेसपॅकचा वापर करू नका. फेस पॅक लावल्याने फेशिअलमुळे आलेला ग्लो निघून जातो.