पायावर पाय ठेवून बसू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2016 3:31 PM
ही पद्धत बसण्यासाठी आपल्यालाही चांगली वाटते. परंतु, यामुळे विविध प्रकारचे गंभीर आजारही होऊ शकतात
खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसतांना अनेकांना पायावर पाय (क्रॉस) टाकून बसण्याचे सवय आहे. ही पद्धत बसण्यासाठी आपल्यालाही चांगली वाटते. परंतु, यामुळे विविध प्रकारचे गंभीर आजारही होऊ शकतात. तसेच लवकर वृद्ध दिसायलाही सुरुवात होते. ज्यादा करुन, महिलांना ही सवय आहे. त्यामुळे या पद्धतीला काहीशी महिलांचीच बसण्याची पद्धतच मानले जाते. महिलाही घर असो किंवा बाहेर नेहमी असे बसणे पसंत करतात. एका संशोधनातून समोर आले आहे की, जास्त वेळ असे बसल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामुळे पेरानियल नर्व पेल्सी व अर्धागवायूही होऊ शकतो. त्यामुळे पायाचा रक्तपुरवठाही योग्यप्रकारे होत नाही. तसेच लवकरच आपण वृद्ध दिसायला लागतो. त्याकरिता पायावर पाय टाकून बसणे हे आरोग्यास हानीकारक आहे. त्याकरिता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.