हिवाळ्यात त्वचेसंबंधी होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्वचेचा नैसर्गिक ओलावा दूर होतो. त्यामुळे त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. अशावेळी त्वचेचा ओलावा किंवा त्वचा मुलायम ठेवण्यासाठी लोक कोल्ड क्रीमचा वापर करतात. याने त्वचा मुलायम तर होतेच, पण त्वचेचा उजळपणा कमी होऊ लागतो, असं तज्ज्ञ सांगतात.
काय होतो परिणाम?
कोल्ड क्रीम घट्ट, तेलकट आणि ऑइल बेस्ड असते. याने त्वचेचा हरवलेला ओलावा परत येतो. पण कोल्ड क्रीम लावून बाहेर उन्हात गेल्यास यावर धुळ आणि मातीचा एक थर जमा होतो. म्हणजे कोल्ड क्रीम लावून बाहेर उन्हात गेल्यास याने त्वचेला नुकसान होतं.
कशी घ्याल काळजी?
- कोल्ड क्रीम खरेदी करताना ही काळजी घ्या की, कोल्ड क्रीम सिलिकन बेस्ड किंवा एसपीएफ तत्त्व असलेलंच घ्या. एसपीएफ नसलेलं क्रीम लावल्याने त्वचा निर्जिव आणि रखरखीत वाटू लागते.
- एसपीएफ तत्व असलेल्या क्रीमचा किंवा लोशनचा वापर तुम्ही दिवसाच्या वेळी करू नका. जर त्वचा सतत रखरखीत होत असेल तर चेहरा चांगला धुवून, पुसून मग क्रीम लावा.
- आंघोळीआधी तेलाने त्वचेची मसाज करा. खोबऱ्याचं तेल आणि ऑलिव ऑइल दोन्ही चांगल्या प्रकारे मिश्रित करुन मसाज करा. याने त्वचा मुलायम होईल.
- त्वचेचा ओलावा कायम ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. त्यासोबतच मसाज केल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करा. फार जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका. याने त्वचा रखरखीत होते.