कधीकधी घाईघाईत आंघोळ करताना आपण फक्त पाणी अंगावर ओतून बाहेर येतो, तर कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढचं नाही तर कधीकधी तासन्तास आंघोळच करत बसतो. अनेकदा सुट्टीच्या दिवशी निवांत वेळ मिळतो आणि त्यादिवशी शरीराची व्यवस्थित स्वच्छता राखण्यासाठी आपण वेळ घेऊन आंघोळ करतो. अशातच आंघोळीदरम्यान आपण काही वस्तूंचा वापर करतो. तुमच्याही बाथरूममध्ये काही खास गोष्टी असतीलच. यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो, तो लोफहचा. तुम्हीही लोफहचा वापर करण्याचे शौकीन असाल तर कदाचित पुढिल काही गोष्टी वाचून तुम्ही त्याचा वापर करणं सोडून देऊ शकता.
टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या अनेक जाहिरातींमध्ये अनेक सेलिब्रिटी किंवा मॉडल्स लोफह घेऊन बॉडिवॉश लावताना दिसतात. लोफह अंगावर घाम स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. परंतु याचा वापर करणं अत्यंत घातक ठरू शकतं. जाणून घेऊया कशाप्रकारे लोफह तुमच्या सुंदर त्वचेसाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतो.
कशासाठी करण्यात येतो लोफहचा वापर?
लोफह कोणतंही जेल किंवा बॉडिवॉश लिक्विडला संपूर्ण शरीरावर अगदी सहज पसरवण्यासाठी मदत करतो. याचा वापर केल्याने साबणाचा किंवा बॉडिवॉशचा उत्तम फेस होतो. लोफह रखरखीत असतो. त्यामुळे बॉडीवर स्क्रब करण्यासाठी त्याचा परिणाम होतो. यामुळे शरीरावरील घाण निघून जाते. लोफहच्या वापरामुळे शरीराची उत्तम स्वच्छता करणं शक्य होतं. याव्यतिरिक्त शरीरावर पसरणाऱ्या बॅक्टेरियापासून लोफह सुटका करण्याचं काम करतो.
लोफहपासून दूर राहणं का आहे आवश्यक?
त्वचा विशेषज्ञ आणि एक्सपर्ट्स यांनी सांगितल्यानुसार, लोफहचा वापर करणं त्वचेसोबतच शरीरासाठीही हानिकारक आहे. यामुळे तुमच्या त्वचेला फायद्यांपेक्षाही जास्त नुकसान होत आहेत.
लोफहच्या वापरामुळे त्वचेला का होतं नुकसान?
लोफह वर जेल किंवा लिक्विड पसरवल्यानंतर आणि त्याआधीही लोफह ओला करणं गरजेचं असतं. एकदा ओला केल्यानंतर लोफह बराच वेळ ओला राहतो. ज्यामुळे यावर बॅक्टेरिया, किटाणु आणि यीस्ट तयार होतात.
त्वचेला कशाप्रकारे होतं नुकसान?
लोफहमध्ये तयार झालेले बॅक्टेरिया, किटाणु आणि यीस्ट आपल्या शरीरामध्ये साबणाच्या फेसामार्फत पसरत असतात. तुम्ही लोफहचा वापर शरीराच्या प्रत्येक अवयवावर करता. जिथून बॅक्टेरिया कधी कधी पाण्याचा वापर करूनही दूर होत नाहीत. तर ते आणखी वाढतात. यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका आणखी वाढतो. इन्फेक्शन व्यतिरिक्त आपल्या त्वचेवर पिंपल्सही होऊ शकतात.
(Image Credit : mycutebathroom.page.tl)
लोफहचा वापर दररोज करा, किंवा कधी कधी, कही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही याचा सुरक्षित वापर करू शकता. समस्या लोफहमध्ये ओलावा असल्यामुळे तयार होतात. अशातच लोफहचा वापर केल्यानंतर तुम्ही तो पूर्णपणे व्यवस्थित कोरडा करा. पंख्याचा उपयोग करून किंवा उन्हामध्ये ठेवा. उन्हामुळे लोफहमध्ये तयार होणारे बॅक्टेरिया संपून जातात. त्यानंतर लोफहचा उपयोग सुरक्षित असतो. याव्यतिरिक्त तुम्ही काही ठराविक दिवसांनी नवीन लोफह खरेदी करून त्याचा वापर करू शकता.