चरबी घटवण्यास मदत करणारी पेयं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2016 11:20 AM
काही पेयांचं सेवन केल्यानेही पोटाची चरबी कमी करु शकता.
वजन घटवण्यासोबतच अनेकांचा कल पोटाची चरबीही कमी करण्याकडे असतो. पण आता पोटाची चरबी करण्यासाठी जिममध्ये जाऊन मेहनत किंवा डायटिंगची आवश्यकता नाही. काही पेयांचं सेवन केल्यानेही पोटाची चरबी कमी करु शकता.ग्रीन टी : नियमित ग्रीन टी प्यायल्याने तुम्ही सहजरित्या वजन कमी करु शकता. मोठ्या प्रमाणात अँटीआॅक्सिडंट असलेल्या ग्रीन टीमुळे चयापचय क्रिया सुधारते. यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.कलिंगडाचा रस : लो कॅलरी असलेला कलिंगडाचा रस पोटाची चरबी घटवण्यात मदत करतो. कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असल्याने तो शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. मिंट आईस्ड टी : मिंट टीमुळे शरीरात गॅस कमी तयार होता. वजन कमी करण्यात मिंट टीपेक्षा चांगला पर्याय नाही. अननसाचा रस : अनानसमुळे पोटाची चरबी सहजरित्या कमी करता येते. अननसमुळे चयापचय वाढते, पचन क्रिया वाढते. cnxoldfiles/em>चॉकलेट शेकच्या सेवनामुळे अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.