जेव्हा फार जास्त थकवा जाणवतो किंवा कामाच्या प्रेशरमुळे झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीरात ब्लड फ्लो प्रभावित होतो. आणि याचा थेट प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. म्हणजे चेहरा ड्राय, उदास आणि थकलेला दिसतो. पण काही टिप्सचा वापर करून तुम्ही थकवा दूर करून ग्लोइंग त्वचा मिळवू शकता.
त्वचा करा हायड्रेट
ज्याप्रमाणे पाण्याच्या मदतीने शरीर हायड्रेटेड ठेवता तशीच त्वचा ड्राय होणे टाळण्यासाठी आणि ग्लोइंग करण्यासाठी त्वचा हायड्रेट करणे गरजेचं असतं. त्वचा हायड्रेट करण्यासाठी तुम्ही एखादं फेस ऑइल वापरू शकता.
चेहऱ्याची रंगत जाऊ नये म्हणून....
जेव्हाही असं वाटेल की, तुमच्या चेहऱ्या रंगत जात आहे तेव्हा हेवी फाउंडेशनच्याऐवजी लाइट बेस असलेलं फाउंडेशनचा वापर करा. स्कीन टोन समान ठेवण्यासाठी तुम्ही सीसी क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायजरचा वापर करू शकता.
नॅच्युरल ब्लशचा वापर
तुमची त्वचा हेल्दी आहे हे दाखवण्यासाठी हवं असेल तर तुम्ही हलका ब्लश वापरू शकता. यासाठी त्वचेच्या रंगाशी समान नॅच्युरल ब्लश शेडचा वापर का आणि हा गालांवर चांगल्याप्रकारे फिरवून लावा.
डोळ्यांमध्ये ड्रॉप
जर झोप पूर्ण झालेली नसेल आणि थकवा असेल तर डोळे लाल होतात. अशात डोळ्यात रिफ्रेशिंग आय ड्रॉप टाकू शकता. पण हा ड्रॉप तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरा. त्यासोबतच तुम्हाला हवं असेल तर वॉटरलाइनवर न्यूड कलर आयलायनर वापरू शकता.