(Image Credit : NowLoss.com)
वाढत्या वयासोबत महिलांना त्वचेवर सुरकुत्यांची येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. सुरकुत्यांच्या डार्क लाइन्सची चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यामुळे सौंदर्याचे तीनतेरा होतात. अनेकदा चुकीचे प्रॉडक्ट्स वापरल्यानेही सुरकुत्यांची समस्या होते. तसेच तणाव, धावपळ, चुकीचं खाणं-पिणं, पुरेशी झोप न घेणे, चेहऱ्याची स्वच्छता न ठेवणे, प्रदूषण यानेही चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. जर तुमच्या चेहऱ्यावरही असे सुरकुत्यांचे संकेत दिसत असतील तर वेळीच उपाय करणे फायद्याचं ठरेल.
(Image Credit : rdmag.com)
वाढत्या वयातही तुम्ही तरूण आणि सुंदर दिसू शकता, पण यासाठी तुम्हाला खाण्या-पिण्याकडे खास लक्ष द्यावं लागेल. तज्ज्ञांनुसार, प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने त्वचेवरील सेल्स वाढतात. याने स्कीन टिश्यू फिट राहतात. प्रोटीनयुक्त डाएट कमजोर पेशींना दूर करते आणि यामुळे सुरकुत्यांच्या समस्येपासून सुटका मिळते.
प्रोटीनयुक्त डाएटने दूर करा सुरकुत्या
तुम्हाला जर सुरकुत्यांची समस्या असेल तर प्रोटीनयुक्त डाएट त्वचेसाठी फार हेल्दी ठरते. प्रोटीन त्वचा तरूण ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावतं. त्यामुळे आहारात प्रोटीनचा समावेश गरजेचा आहे. अशात ड्रायफ्रूट्सचा आहारात नियमित समावेश करा. याने तुम्हाला सुरकुत्यांपासून सुटका मिळेल.
रावस मासे
सॅल्मन फिश म्हणजेच रावस मासे खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. यात चिकनच्या बरोबरीत प्रोटीन आणि न्यूट्रिएंट्स असतात, जे शरीराला वेगवेगळे फायदे देतात. १०० ग्रॅम सॅल्मनमध्ये २० ग्रॅम प्रोटीन असतं. सुरकुत्यांची समस्या दूर करायची असेल तर या माश्यांचं सेवन सुरू करा.
कोलेजन प्रोटीन
कोलेजन हे शरीरातील एक प्रोटीन आहे जे त्वचेला सुरक्षा प्रदान करतं. यात प्रोलिन, ग्लायसिन आणि आर्जिनिनसारखे अमिनो अॅसिड असतं. याने शरीराचे कनेक्टिव टिशूज निरोगी राखण्यास मदत मिळते. तुम्ही बाजारात सहजपणे या प्रोटीनचे पदार्थ मिळवू शकता. पण हे पदार्थ खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
ड्राय फ्रूट्स
(Image Credit : Infipark.com)
बदाम आणि अक्रोडसारखे ड्राय फ्रूट्स प्रोटीनचा चांगला स्त्रोत असतात. जर तुम्ही ५० ग्रॅम बदाम खाल तर तुम्हाला १० ग्रॅम प्रोटीन मिळेल. त्यासोबतच बदाम तुमचं कोलेस्ट्रॉल मेन्टेन ठेवण्यासही मदत करतात. याने हृदय निरोगी ठेवण्यासही मदत मिळते.
एवोकाडो
एवोकाडो एक सुपरफूड आहे जे फायटोकेमिकल्स आणि इतर महत्वपूर्ण पोषक तत्त्वांनी भरपूर असतं. याने वय वाढण्याची गती कमी करण्यात मदत मिळते. एवोकाडोमध्ये ७३ टक्के पाणी, १५ टक्के चरबी, ८.५ टक्के कार्बोहायड्रेट आणि २ टक्के प्रोटीन असतं.