देशात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2016 8:31 AM
भारतात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू होतो.
‘दारूबंदी’ची मागणी जोर पकडत असतानाच दारूमुळे मृत्यू होण्यासंबंधीचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. भारतात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू होतो. याचा अर्थ की, दररोज 15 लोक दारूच्या व्यसनापायी आपले आयु्ष्य गमावतात.इंडियास्पेंड संस्थेने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2013 सालच्या रिपोर्टचे विश्लेषण करून हे विदारक सत्य बाहेर आणले.दारुमुळे मृत्यू होण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तमिळनाडूचा क्रमांक येतो. तज्ज्ञांच्या मते, दारूचे अतिसेवनामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते.बहुतांश गुन्हे आणि अपघात हे दारूमुळे होतात. महिलांचा लैंगिक छळ आणि चोरी यांसारख्या गुन्ह्यांचा संबंध दारूशी असल्याची माहिती एस. राजू यांनी दिली.गेल्या काही वर्षांमध्ये दारूचे दरडोई सेवनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार 2003-05 मध्ये दारूचे दरडोई सेवन 1.6 लिटर होते ते 38 टक्क्यांनी वाढून 2010-12 मध्ये 2.2 लिटर झाले.सुमोर ११ टक्के भारतीय हे बिंज ड्रिंकर (एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिणारे) आहेत. जागतिक लोकसंख्येचा विचार करता हेच प्रमाण 16 टक्के आहे.अलिकडच्या काळामध्ये राजकीय इच्छाशक्ती व प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी दारूबंदीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. तमिळनाडूमध्ये जयललितांनी निवडूण आल्यावर पहिल्याच दिवशी 500 दारूची दुकाने बंद केली. एप्रिल महिन्यात बिहारमध्ये नितीशकुमारांनी दारु विक्री, सेवन आणि उत्पादनावर बंदी घातली.तिकेड केरळमध्येदेखील 2014 साली पंचतारांकित हॉटेल्स वगळता इतर सर्व ठिकाणी दारुबंदी लागू केली. दारुबंदीला समर्थन करण्यामध्ये महिला आघाडीवर आहेत. तमिळनाडूमध्ये 47 टक्के तर केरळमध्ये 52 महिलांनी दारूबंदीच्या निर्णय योग्य असल्याचे सांगितले.