व्यायामामुळे 13 प्रकारच्या कॅन्सरपासून मुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2016 3:07 PM
दररोज व्यायाम केल्यास १३ प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.
रोज व्यायाम केल्याने काय काय फायदा होतात याची यादी करायचे ठरवले तर हात थकतील मात्र ती यादी पूर्ण होणार नाही. व्यायामुळे आरोग्याला कोणत्या प्रकारे फायदा होत नाही. शारीरिक क्षमतेपासून ते कॅन्सरपर्यंत सर्व गोष्टींत साध्या व्यायामाने लाभ मिळतो.नियमित व्यायाम केल्याने स्तन, मोठे आतडे आणि फफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो हे माहित होते. परंतु आता एका नव्या रिसर्चनुसार दररोज व्यायाम केल्यास १३ प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.पोट, रक्त, यकृत, अन्ननलिका, गर्भाशयाला असलेले श्लेष्मल, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, डोके व मान, गुदाशय आणि मूत्राशयाचा कॅन्सरचा यामध्ये सामावेश होतो. सुमोर 14.4 लाख स्त्री-पुरूषाकडून जमा केलेल्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे लठ्ठपणा असलेल्या लोकांनासुद्धा व्यायामामुळे हा फायदा होतो.नियमित व्यायाम करणाºया लोकांना व्यायाम न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत कॅन्सर होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी कमी असते. येथे हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे की, या संशोधनाचे निष्कर्ष लोकांच्या आठवणींवर आधारित आणि निरीक्षणात्मक आहेत. त्यामुळे सखोल संशोधनाची गरज संशोधक व्यक्त करत आहेत.