आपली त्वचा नेहमी सुंदर आणि चांगली दिसण्यासाठी महिला पार्लरला जाण्यापासून घरगूती उपायांचा वापर करण्यापर्यंत अनेक पध्दतींचा वापर करतात. पण प्रदूषण, खाण्यापिण्यात समतोल नसणं, अपुरी झोप यांमुळे कितीही काही केलं तरी त्वचा चांगली दिसत नाही. तुम्हाला सुद्धा त्वचेवर आलेल्या सुरकुत्या आणि डाग दूर करायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
सध्याच्या काळात त्वचेवरच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी महिला कोलेजन थ्रेड लिफ्ट फेशियलची ट्रिटमेंट करत आहेत. महिलांमध्ये कोलेजन थ्रेड लिफ्ट फेशियलची चर्चा खूपच आहे. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या दूर करून ग्लोईंग स्किन देत असलेल्या या ट्रिटमेंटबद्दल सांगणार आहेत.
ब्युटी एक्सपर्टच्यामते कॉपर पेप्टाईड्सचे खूपच लहान मॉलेक्यूल्स असतात. जे कोलोजन थ्रेड फेशियल द्वारे त्वचेवर लावल्यानंतर शरीरात प्रवेश करू शकतात. स्किनच्या आत गेल्यानंतर काही वेळातच ते त्वचेतील डॅमेज झालेल्या सेल्सना रिपेअर करतं आणि त्वचेला ग्लोईंग आणि सॉफ्ट बनवत असतं.
(image credit-.intotheblue)
असं काम करते ही थेरेपी
कॉपरमध्ये दोन वेगवेगळे फिजीओलॉजीकल आणि मेटाबॉलिक प्रकिया करणारे गुण करतात. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरत असतात. त्यातील ह्यूमन पेप्टाइड कॉपरच्या गुणांना एकत्र करतात. अनेक त्वचा आणि केसांच्या उत्पादनांमध्ये पेप्टाईडचा वापर केला जातो. याचा वापर करून चेहरा, मान तसंच डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळ काढता येऊ शकतात.
(image credit-hautarzt.com)
फेशियल करण्याची प्रकिया
या प्रकारचं फेशियल करत असताना सुरूवातीला त्वचेतून घाण आणि अतिरीक्त तेल काढून टाकण्यासाठी कोलोजन क्लींजरचा वापर केला जातो. त्यानंतर स्क्रब करून ब्लॅक हेट्स काढून टाकले जातात .नंतर १० ते १५ मिनिटं कोलोजन क्रिम लावून मसाज केली जाते. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्वचा रिपेअर होते.
नंतर १५ ते १० मिनिटं कोलेजनपॅक लावून ओल्या कापसाने साफ केलं जातं. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसून येते. कोलोजन स्प्रे केल्यानंतर कॉपर थ्रेड स्किनवर ८ मिनिटांपर्यंत ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे डोळे, ओठ आणि कपाळावरच्या सुरकुत्या कमी होतात. या थ्रेड्सवर अल्ट्रासोनिक रेज् टाकले जातात. जे त्वचेच्या आत पेनिट्रेट होत असतात. ( हे पण वाचा-लिपस्टिक ऑनलाईन खरेदी करायचीय?, मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी)
ही ट्रिटमेंट केल्यानंतर २४ तासांसाठी स्किनला फ्री सोडलं जातं. त्यानंतर कॉपर पेप्टाइड्स त्वचेच्या आत जाऊन आपलं काम करतात. त्यामुळे चेहरा चांगला राहतो. पण ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्वचेवर २४ तास काहीही लावू नका. कोणत्याही वयोगटातील महिला ही ट्रिटमेंट करू शकतात. वय वाढीच्या खुणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणारी ही ट्रिटमेंट आहे. ( हे पण वाचा-केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण)