FASHION : कानातले कुंडल खुलवी सौंदर्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 11:40 AM
कानात कुंडल घालणे हे १६ शृंगारपैकी एक मानले जाते. कानात घातल्यामुळे आपला संपूर्ण लुकच बदलतो.
-Ravindra Moreमेकअप, श्रृंगार करणे महिलांचा जणू जन्मसिद्ध हक्कच आहे. आपल्या सौदंर्याची काळजी घेण्यासाठी स्त्री सदैव तत्पर असते. त्यासाठी ती वेगवेगळे आभूषणे परिधानही करते. त्यापैकीच एक आभूषण म्हणजे कानातले कुंडल होय. विशेष म्हणजे कानात कुंडल घालणे हे १६ शृंगारपैकी एक मानले जाते. कानात घातल्यामुळे आपला संपूर्ण लुकच बदलतो. त्यानुसार बाजारात वेगवेगळ्या डिझाईनचे कुंडले दिसून येतात. मात्र आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी योग्यच कानातले आभूषणाची निवड करणे आवश्यक असते. खाली काही पर्याय सुचविले असून याचा वापर करुन आपण आपले सौंदर्य खुलवू शकता. * जर आपला चेहरा आयताकृती असेल तर अशांनी लांब कानातले वापरु नये. कारण यामुळे आपला चेहरा आणखीच उभट वाटू शकतो. * सध्या गोल, आयताकृती, चौकोनी असे काही मौल्यवान धातूपेक्षा वेगवेगळ्या फँन्सी कानातले घालण्याची फॅशन आहे. त्यात डायमंडचाही प्रकार येतो. असे कुंडले वापरु न आपले * सध्या कानात घालण्यासाठी सर्वात चालणारा प्रकार म्हणजे स्टड. हे कानातले कोणालाही सूट होतात. पार्टीवेअर असोत किंवा फॉर्मल आऊटफिट हे कानातले चांगलेच दिसतात.* तुम्ही जर पारंपारिक वस्त्र परिधान करणार असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. हे कानातले एकदम हटके आकारात येतात. साडी असेल किंवा पंजाबी किंवा जीन्स हे कानातले कशावरही सूट होतात.