हिवाळा आता सगळीकडे चांगलाच जाणवू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचेची आणि आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. या दिवसात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अनेकजण तर थंडीमुळे आंघोळ करण्यासही नकार देतात.
थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात. पण हे चुकीचं आहे. कितीही थंडी असली तरी आंघोळ ही गरजेची आहे. कारण दिवसभर आपल्या शरीरावर धूळ-माती चिकटलेली असते. ही धूळ त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये अडकून राहते. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त उष्णता आणि विषारी तत्व शरीरातून बाहेर येऊ शकत नाहीत.
रोज आंघोळ का गरजेची?
शरीरात सतत होणाऱ्या प्रक्रियांमुळे वेगवेगळे द्रव्य शरीराच्या बाहेर टाकले जातात. यातील काही मलमूत्रांव्दारे बाहेर निघतात आणि काही घामाच्या माध्यमातून बाहेर येतात. अशात जर तुम्ही त्वचेची स्वच्छता केली नाही तर रोमछिद्रे धुळीने बुजलेली असलेल्या कारणाने घाम शरीरातून बाहेर येऊ शकत नाही. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वातावरण कोणतही असो आंघोळ ही गरजेची आहे.
थंडीमध्ये आंघोळ
नेहमी थंड पाण्याने आंघोळ करणे फायदे ठरते. तसे तर उन्हाळ्यात अनेकजण थंड पाण्याने एकदा नाही तर दोन-तीनदा आंघोळ करतात. पण थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण याने शरीराला नुकसान होतं. पाणी फारच थंड असेल तर कोमट पाण्याने आंघोळ केली तरी चालेल.
सर्दी असताना आंघोळ
जर तुम्हाला पाणी फार जास्त थंड वाटत असेल आणि तुम्हाला सर्दी झालेली असेल तर पाणी थोडं कोमट करा. पण रोज थंड पाण्याने आंघोळ करण्याचीच सवय असायला हवी. रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची बाहेरील त्वचेत होणारा रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि हळूहळू हा प्रवाह कमी होत जातो. सोबतच बाहेरील त्वचेवर असलेल्या रक्तपेशी कमजोर होऊ लागतात.
सामान्य पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
सामान्य पाण्याने आंघोळ केल्याने रक्तपेशी मजबूत होतात. आपल्या शरीराची बाहेरील त्वचा जेव्हा थंड पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ती स्वाभाविकपणे आकुंचन पावते. याने त्वचेला आराम मिळतो. सामान्य किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह स्वाभाविक राहतो आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते.