कानात मळ जमा होणे ही असामान्य बाब नाहीये. आपल्यापैकी सर्वांनाच ही समस्या होते आणि वेळोवेळी कानांची स्वच्छता करणेही गरजेचे आहे. योग्यप्रकारे स्वच्छता न झाल्यास किंवा कानात जास्त मळ जमा झाल्यास कान दुखणे, खाज येणे, जळजळ होणे, कमी ऐकायला येणे अशा समस्या होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला कान स्वच्छ करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
कोमट पाणी
पाणी कोमट करा आणि कापसाच्या मदतीने ते काही थेंब कानात टाका. काही वेळासाठी ते कान तसाच राहू द्या आणि काही वेळाने काम एका बाजूला करुन पाणी बाहेर काढा. याने कानाची चांगली स्वच्छता होईल.
हायड्रोजन पॅराक्साइड
कमी प्रमाणात हायड्रोजन पॅराक्साइड पाण्यामध्ये मिश्रित करुन थोड्या प्रमाणात कानात टाका. काही वेळाने हे पाणी कानातून बाहेर काढण्यासाठी एका बाजूला करा.
तेल
ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणे किंवा मोहरीच्या तेलात थोडं लसूण टाकून गरम करा. आता हे तेल कोमट झाल्यावर कापसाच्या मदतीने कानात टाका. असे केल्याने कानातील मळ सहजपणे बाहेर येईल.
कांद्याचा रस
कांदा वाफेवर शिजवून त्याचा रस काढा. या कांद्याच्या रसाचे काही थेंब ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कानात टाका. यानेही कानातील मळ निघण्यास मदत होईल.
मिठाचं पाणी
गरम पाण्यात मीठ टाकून याचं मिश्रण तयार करा. याचे काही थेंब कापसाच्या मदतीने कानात टाका आणि काही वेळाने कान एका बाजूला करुन पाणी बाहेर येऊ द्या. कानात काही जखम असल्यास हा उपाय करु नये.
टिप : हे उपाय फायदेशीर असले तरी याचा उपयोग करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण कान हा नाजूक अंग आहे. त्यामुळे काही वेगळी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आधीच काळजी घेतलेली बरी.