प्रत्येक महिलेचं आपल्या केसांवर सर्वात जास्त प्रेम असतं. मुली आपले केस आणि केसांच्या स्टाइलवर सर्वात जास्त प्रेम करतात. सुंदर आणि ग्लॅमरस दिसावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यासाठी अनेक मुली आणि महिला वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स ट्राय करतात.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक हेअर स्टाइल फार चर्चेत आहे. या अनोख्या हेअर स्टाइलचं नाव 'फ्लावर वास हेयर' असं आहे.
या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड अमेरिकेतील सिंगर आणि अॅक्ट्रेस Beyonce मुळे आला असं मानलं जातं.
काही दिवसांपूर्वी एका मॅग्झिनच्या कव्हर शूटसाठी अमेरिकेतील सिंगर आणि अॅक्ट्रेस Beyonce ने आपल्या डोक्यावर फ्लोरल हेडवियर घातलं होतं. जे दिसायला एका फुलांच्या गुच्छाप्रमाणे दिसत होतं.
त्यानंतर हाँगकाँगमधील यूट्यूब स्टार आणि फॅशन आयकॉन Taylor R ने हेअर स्टाइलचा ट्यूटोरिअल व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या हेअर स्टाइलचा ट्रेन्ड वायरल झाला. त्यानंतर जगभरातील मुली फूलांच्या गुच्छासारखा दिसणारी हेअर स्टाइल ट्राय करू लागल्या.