(Image Credit : trinityhillsgrooming.com)
आजकाल दाढी ठेवण्याचा म्हणजेच बिअर्ड लूकची फारच क्रेझ बघायला मिळते. स्टायलिश लूकसाठी अनेकजण वेगवेगळ्या स्टाइलची दाढी ठेवण्यावर भर देताहेत. पण अनेकदा इन्फेक्शन किंवा पौष्टीक आहार न मिळाल्याने हवी तशी दाढी अनेकांना ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही अशांसाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
१) आजही शेव्हींग करणे हा दाढीचे केस दाट करण्याचा सोपा उपाय मानला जातो. दाढीचे केस वाढवण्यासाठी आठवड्यातून किमान तीनवेळा शेव्हींग करायला हवं. सुरुवातीला बाहेर एखाद्या सलूनमध्ये शेव्हींग करा नंतर घरीच केली तरी चालेल.
२) चांगल्या डाएटचा प्रभाव आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर होतो. तर केसांची वाढ होण्यासाठीही चांगली डाएट गरजेची आहे. त्यामुळे तुमच्या नियमीत आहारात व्हिटॅमिन बी चा समावेश करा. व्हिटॅमिन बी१, बी६ आणि बी १२ सुद्धा केसांची वाढ होण्यास मदत करतात.
३) मसाज केल्यानेही केसांची वाढ चांगली होते. दाढी वाढण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास फायदा होईल. त्यासोबतच आवळ्याच्या तेलानेही दाढीचे केस चांगले वाढतात.
४) प्रोटीन शरीरासाठी एक पौष्टीक तत्व मानलं जातं. याने केस वाढण्यास मदत होते. सोबत दिवसभरात भरपूर पाणी पिणेही केस वाढण्यास मदत करतात. सोबतच केसगळती रोखण्यासाठी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
५) अनेकदा इन्फेक्शनमुळे दाढीचे केस कमी होऊ लागतात. त्यामुळे जेव्हाही शेव्हींग कराल तेव्हा सगळं साहित्य हायजिन आहे का हे चेक करा. तुमची पर्सनल शेव्हींग किटही कुणाशी शेअर करु नका. याने एकमेकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
६) शरीराच्या इतर अंगांसारखंच धुम्रपान केसांसाठीही नुकसानकारक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीन शरीराला न्यूट्रायंट्स अब्जॉर्ब करण्यापासून रोखतं आणि ब्लड सर्कुलेशनही कमी करतं. म्हणजे धुम्रपानामुळे केसगळती होते. याचा प्रभाव दाढीच्या केसांवरही दिसतो.