चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी चेहरा फेसवॉस लावून धुणं हा सर्वात योग्य उपाय आहे. यामुळे तुमची त्वचा आईल फ्री राहण्यास मदत होईल त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील घाणही स्वच्छ होण्यास मदत होते. परंतु चेहरा धुण्याबाबत आपल्या मनात अनेक शंका असतात. जसं चेहरा किती वेळा धुणं गरजेचं असतं? सतत चेहरा धुतल्याने त्वचेला काही त्रास तर होणार नाही ना? यांसारखे अनेक प्रश्न मनामध्ये उपस्थित होतात. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.
जर तुमची त्वचा ऑयली असेल आणि तुम्ही दिवसातून दोन वेळा चेहरा धुत असाल तर तुमच्या त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे त्वचा उजळण्यासही मदत होईल. परंतु ज्या लोकांची स्कीन ड्राय असेल त्यांनी फक्त एकदाच चेहरा धुवावा. कारण सतत चेहरा धुतल्याने त्वचेवरील तेल निघून जाते आणि स्कीन आणखी ड्राय होऊन स्कीनला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर चेहऱ्याची त्वचा फार नाजूक असते. सतत चेहरा धुतल्यामुळे त्वचा कमजोर होते. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, दिवसातून दोन वेळा चेहरा धुणं गरजेचं असतं. एकदा सकाळी आणि दुसरं संध्याकाळी. सकाळी चेहरा धुणं फार गरजेचं असतं. त्यामुळे स्कीन पोर्स स्वच्छ होतात.
तेच संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर चेहरा धुणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होईल आणि चेहऱ्यावरील सर्व घाण स्वच्छ होईल. शक्य असल्यास तुम्ही हर्बल पॅकचाही वापर करू शकता. उन्हाळ्यामध्ये हर्बल पॅक वापरणं फायदेशीर ठरेल.
- फेसवॉशचा वापर करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. यामुळे हातांवर असलेली घाण चेहऱ्यावर लागणार नाही. याचबरोबर प्रयत्न करा की आधी चेहरा पाण्याने स्वच्छ करा आणि त्यानंतरच चेहऱ्यावर फेसवॉश लावा.
- फेसवॉशचा वापर करत असाल तर त्याला थोड्या वेळासाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. कमीत कमी 2 मिनिटं लावून ठेवल्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवून टाका.
- चेहरा फार वेळ धुवू नका. त्यामुळे चेहऱ्याला नुकसान पोहचू शकतं.
- जर तुमची स्कीन सेन्सिटिव्ह असेल तर कोमट पाण्याचा वापर करणं चांगलं राहिल. शक्य असल्यास एखाद्या चांगल्या बेबी सोपचा वापर करा.