शांत झोपेसाठी नव्या स्वरुपातील अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 3:10 PM
सिमॉन फ्रेसर यांनी मायस्लीप बटन नावाचे अॅप तयार केले आहे
हल्लीचे युग हे धावपळीचे असल्याने, मनात नेहमी वेगवेगळे विचार सुरु असतात. त्यामुळे अनेकांना रात्रीचीही शांत झोप लागतच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून नेहमी वेगवेगळे इलाज केले जातात. शांत झोप न लागणे ही समस्या असणाºयांची संख्या आजघडीला मोठी आहे. याकरिता वैज्ञानीक ांनी कॉग्रिटीव्ह शफल नावाच्या तंत्राचा वापर असलेले झोपेसंबंधीचा अॅप नवीन स्वरुपात तयार केले आहे. कॅनडातील . यामध्ये संशोधकांनी झोप न येणाºया १५४ विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. सीरियल डायव्हर्स इमॅजिनिंग (एसडीआय) ही प्रक्रिया झोपेला जाताना घडते. त्यामुळे पंधरा मिनिटात झोप येण्यास सुरुवात होते. मानवी मेंदू हा विचारात असतो, त्याला थांबविणे अवघड आहे. पण एसडीआयमुळे त्याला मदत होते. यामध्ये शांत झोप लागण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.