Mustard Oil and Garlic benefits for skin : मोहरीच्या तेलामध्ये भरपूर औषधी गुण असतात. या तेलाचा वापर कंबरदुखी, मानदुखी, हात-पाय किंवा खांदेदुखी दूर करण्यासाठी आणि डोक्याची मालिश करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही ५० मिली मोहरीच्या तेलात ४ ते ५ लसणाच्या कळ्या गरम करून शरीराची मालिश केली तर मांसपेशीच्या दुखण्यातून तुमची सुटका होईल. कारण मोहरीचं तेल आणि लसूण दोन्ही गोष्टी गरम असतात. त्यासोबत या दोन्ही गोष्टींचे इतरही अनेक फायदे असतात. तेच जाणून घेऊया.
लसूण आणि मोहरीच्या तेलाचे फायदे
त्वचा होईल चमकदार
त्वचा ग्लोईंग करण्यात या दोन्ही गोष्टींची मदत मिळते. याने त्वचा उजळते आणि चमकदार दिसते. यातील तत्वांमुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि चेहरा मॉइश्चराइज होतो. ज्यामुळे त्वचेवर खाज येण्याची समस्या होत नाही.
सर्द-खोकला होईल दूर
मोहरीचं आणि लसणाच्या मिश्रणाने शरीराला उष्णता मिळते. याने बंद झालेलं नाक मोकळं होतं. तसेच श्वास घेण्यासंबंधी समस्याही दूर होते. लसणात अॅंटी-वायरल आणि अॅंटी-ऑक्डिेंट्स गुण असतात, जे इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत करतात.
थकवा दूर होईल
मोहरीच्या लसूण मिक्स करून शरीराची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि तुम्हाला सतत फ्रेश वाटतं. या तेलाने मालिश केल्यावर संधिवात आणि सूज या समस्याही दूर होतात.
संधिवात होईल दूर
या तेलाने नियमितपणे मालिश केल्याने संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत मिळते. कारण यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
दातांचं दुखणं होईल दूर
दातांमध्ये वेदना होत असेल तर या तेलाने तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी लसूण आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट वेदना होत असलेल्या जागी लावा. याने आराम मिळेल.
केस होतील मजबूत
लसूण आणि मोहरीच्या तेलाच्या मिश्रणाने केस मजबूत होतात आणि दाटही होतात. ज्या लोकांना केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या असतील त्यांना या तेलाने मालिश करावी.