(Image Credit : garnierusa.com)
सध्या वातावरणात फारच बदल होत आहे. थंडी कमी झाली असून जरा उकाडा जाणवायला लागला आहे. अर्थातच या वातावरण बदलाचा आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर प्रभाव पडतो. धूळ आणि मातीमुळे चेहऱ्यावर ब्लॅक आणि व्हाइट हेड्सची समस्या वाढत आहे. तुम्हीही चेहऱ्यावरील वाढत्या ब्लॅक आणि व्हाइट हेड्समुळे हैराण असाल तर एक खास स्क्रब तुम्ही घरीच तयार करू शकता.
प्रदूषणामुळे वाढते समस्या
ही काही वयामुळे होणारी समस्या नाही. तर ही समस्या कोणत्याही वयात कुणालाही होऊ शकते. धूळ-माती जेव्हा चेहऱ्यावरील पोर्समध्ये जमा होतात तेव्हा हे पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचा योग्यप्रकारे श्वास घेऊ शकत नाही. याच कारणामुळे चेहऱ्यावर ब्लॅक आणि व्हाइट हेड्स दिसायला लागतात.
असा तयार करा कॉफी स्क्रब
दोन चमचे दह्यात एक मोठा चमचा कॉफी पावडर आणि बेसन मिश्रित करा. हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकत्र करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ही पेस्ट जिथे ब्लॅक हेड्स जास्त आहेत त्या जागेवर लावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरील मेकअप काढूनच ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.
मॉइश्चरायजरही गरजेचं
सर्कुलर मोशनमध्ये असं दोन ते तीन मिनिटांसाठी करा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यानंतर चेहऱ्यावर टोनरचा वापर करा. त्यासोबतच चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावणे विसरू नका.