(Image Credit : stronghair.org)
शॅम्पू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अनेक महिलांना केस चिकट होणे किंवा गुंतल्याची समस्या होते. तुम्हीही याच समस्येने हैराण झाले आहात का? जर उत्तर हो असेल तर एका नैसर्गिक उपायांने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. शार्मेन डीसूजाने त्याच्या किचन क्लिनीक पुस्तकात यावर एक उपाय सांगितला आहे.
काय आहे उपाय?
केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी तुमच्या किचनमधीलच गोष्टींची मदत होऊ शकते. यात ग्रीन टी, पुदीना आणि लिंबाचा समावेश आहे. लिंबू एक नैसर्गिक एस्ट्रीजेंट आहे, जे तुमच्या डोक्याच्या त्वचेवरुन ऑइल दूर करण्याचं काम करतात. सोबतच ग्रीन टी आणि पुदीन्यामुळे तुमचे केस नरिश होतात. तसेच केसांची अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुणांमुळे इन्फेक्शनपासून बचाव केला जातो.
साहित्य
- २ ग्रीन टी बॅग
- ५ पुदीन्याची पाने
- ५०० एमएल पाणी
- एका लिंबाचा रस
- स्ट्रेनर
कसं कराल तयार?
- ग्रीन टी च्या दोन बॅग, ५ पुदीन्याची पाने ५०० एमएल पाण्यात उकडून घ्या.
- आता यात लिंबाचा रस मिश्रित करा.
- हे मिश्रण गाळून एका भांड्यात काढा.
- आता या मिश्रणाने केस आणि खासकरुन डोक्याची त्वचा धुवा. याने केसांना चिकटलेलं ऑइल आणि डोक्याच्या त्वचेचं ऑइल निघून जाईल.