(Image Credit : uralstk.ru)
चेहऱ्यावर, नाक आणि गळ्याच्या आसपास झालेले ब्लॅकहेड्स संपूर्ण सौंदर्य नष्ट करतात. अनेकदा त्यासाठी पार्लरचा आधार घेण्यात येतो. पण पार्लरच्या ट्रिटमेंट्सचा वापर करून ते काढणं पेनफुल ठरतं. पार्लरमध्ये ब्लॅकहेड्स पोर्सवर दाब देऊन काढण्यात येतात. पण असं केल्याने हाताच्या नखांचे निशाण पडतात. अशातच ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला पार्लरमधील वेदनादायी ट्रिटमेंट करण्याची गरज भासणार नाही आणि कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत.
जेव्हाही सर्दी-खोकल्यामुळे नाक बंद होतं, तेव्हा आपल्यापैकी अनेकजण स्टीम घेतात. स्टीम सर्दी-खोकला ठिक करण्याचा उत्तम आणि सोपा उपाय आहे. यामुळे शरीरातील कफ बाहेर टाकण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच ब्लॅक आणि व्हाइट हेड्सपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्वचेच्या पोर्समधील घाण काढून टाकण्यासाठी स्टीमचा उपयोग होतो.
जर तुम्ही विचार करत असाल की, बाजारातील महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सशिवाय तुमची त्वचा हेल्दी, स्वच्छ आणि डागरहित दिसावी तर चेहऱ्यावर वाफ घेण्यास सुरुवात करा. याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. स्टीम कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. सर्दी-खोकला दूर करण्यासोबतच त्वचेच्या समस्या ठिक करण्यासाठी स्टीम घेण्याचे अनेक फायदे आहेत.
फेस स्टीमिंगमुळे फक्त तुमचा चेहरा ग्लो होण्यास मदत होत नाही तर तुम्हाला फ्रेश लूकही मिळतो.
अशी घ्या स्टीम
सर्वात आधी स्टीम घेण्यासाठी एखादं स्टीमर घ्या. स्टीमर बाजारात अगदी सहज उपलब्ध होतं. त्याऐवजी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करून स्टीम घेऊ शकता. लक्षात ठेवा स्टीम घेताना तुमच्या संपूर्ण चेहऱ्याच्या त्वचेला स्टीम मिळणं आवश्यक असतं.
स्टीम घेण्याचे फायदे :
- स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील त्वचेवर असलेली संपूर्ण धूळ, माती, मळ स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्याचे बंद पोर्स उघडतात. तसेच ही स्किनमधील ब्लॅक हेड्स अगदी सहज काढून टाकण्यासाठी मदत करते. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
- स्टीम घेण्याचा दुसरा फायदा म्हणजे, चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळेच त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यास मदत होते.
- स्टीम घेतल्याने पिंपल्स आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
- स्किनचा मॉयश्चर बॅलेन्स करण्यासाठीही स्टीम घेणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तज दिसू लागते.