सध्या अनेक लोक कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. हेयर कलर अप्लाय करून तुम्ही तुमचे पांढरे केस लपवू शकता. परंतु, काही दिवसांनी हे पुन्हा दिसू लागतात. पांढरे केस होण्याची अनेक कारणं असतात. यामध्ये तुमचा आहार आणि तुमची जीवनशैली यांची महत्त्वाची भूमिका असते. याव्यतिरिक्त कमी वायातच केस पांढरे होण्याची अनेक कारणं असतात. अनेकदा पांढरे केस जेनेटिक कारणांमुळे होतात. परंतु प्रत्येकवेळी हेच कारण असेल असं नाही. केस पांडरे होण्यामागे अनेक कारणं असतात. जाणून घेऊया कारणांबाबत...
धूम्रपान
ज्या व्यक्ती जास्त धुम्रपान करतात त्यांना केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, ज्या व्यक्ती धुम्रपान करतात. त्यांचे केस लगेच पांढरे होण्याची शक्यता इतर लोकांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी जास्त असते. धुम्रपानाच्या सवयीमुळे आरोग्याला अनेक घातक परिणामांचा सामना करावा लागतो. यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका आणखी वाढतो.
हार्मोन्स
अनेकदा शरीरामध्ये हार्मोन्सची लेव्हल बिघडल्याने केस पांढरे होतात. हार्मोन्स असंतुलित झाल्याने केस कोरडे होतात आणि केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. केसांची चमकही कमी होते.
तणाव
तणाव हे शरीराच्या समस्या वाढण्याचं सर्वात मोठ कारण आहे. कमी वायत केस पांढरे होण्याचंही मुख्य कारण तणावचं असतं. जास्त तणाव घेतल्याने केसांचा नॅचरल कलर नाहीसा होतो. त्यामुळे केसांचं आरोग्य राखण्यासाठी तणावापासून दूर रहा.
प्रदूषण
वातावरणामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे केसांवर नकारात्नक परिणाम होतो. प्रदूषित हवेमधील तत्व केसांना डॅमेज करतात. ज्यामुळे केस पांढरे होतात. प्रदूषित हवेमध्ये असलेलं फ्री-रॅडिकल्स मेलानिन डॅमेज करतात. ज्यामुळे केस पांढरे होतात.
अनहेल्दी डाइट
आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश न केल्यानेही केसांवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या. फास्टफूड्स आणि जंक फूड्सचं अधिक सेवन करण्यापासून बचाव करा. शरीराला आवश्यक न्यूट्रिएंट्स नाही मिळाले तर केसांचा नैसर्गिक रंग नाहीसा होतो.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.