शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 7:32 PM

कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा.

केस गळण्याची समस्या सध्याच्या वातावरणात सगळ्याच वयोगटातील लोकांना उद्भवते. धुळ, प्रदूषण याशिवाय शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक न मिळाल्यास केस गळण्याची समस्या उद्भवते. सध्या लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे बाहेरच्या धुळीशी फारसा संबंध येत नाही. तरिही अनेकांना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पण यासाठी तुम्हाला लगेचच स्पा आणि महागड्या ट्रिटमेंटसाठी सलूनमध्ये जाण्याची काहीही गरज नाही. घरच्याघरी बटाट्याच्या रस वापरून तुम्ही रिजल्ट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करायचा केसांसाठी फायदेशीर असलेला बटाट्याचा रस.

बटाट्याचे केसांना फायदे

कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्या ही दूर होईल.

केसांना सुंदर आणि काळेभोर  होण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरत असतो.  ज्या लोकांना केस गळण्याची समस्या जाणवते अशा लोकांनी जर बटाट्याचा वापर केला तर  फायद्याचं ठरेल. त्यामुळे केसांची वाढ चांगली होईल. बटाट्यात असलेले व्हिटामीन सी आणि आर्यन, व्हिटमीन बी केसांना बळकटी देण्यासाठी फायदेशीर ठरतात.  तसंच याचा वापर केसांवर केल्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होऊन  केस गळणं बंद होतं. 

कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात.  कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्या ही दूर होईल.

असा तयार करा. 

सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या, नंतर बटाटा किसून त्याचा रस गाळून घ्या. बटाट्याचा रस हाताने पिळून घेतला तरी चालेल. एका भांड्यात रस काढून कापसाने केसांच्या मुळांना लावा. संपूण डोक्याला हा रस लावून झाल्यानंतर २० मिनिट वाट पाहा. त्यानंतर केस धुवून टाका. चांगला रिजल्ट दिसण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करा. 

मऊ आणि मुलायम केसांसाठी १ ते २  बटाटे किसून घ्या. यामध्ये मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा. ही पेस्ट केसांना लावा. हा हेअर पॅक सुकू द्यावा. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवावेत.  केस धुण्यासाठी जर तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तर  फायदेशीर ठरेल. 

केसांमध्ये कोंड्याचा त्रास दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हा पॅक केसांना मूळासकट लावा. २ तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवावेत. आठवडा भरात २-३ वेळा हा प्रयोग करा. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होईल. केस लांब वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा. हा पॅक केसांवर लावा. त्यानंतर पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे दीर्घकाळ केसांचं सौंदर्य टिकायला मदत होते. 

हे पण वाचा-

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्यHair Care Tipsकेसांची काळजी